शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महिंद्राच्या ‘मराझ्झो’चे नाशकात ग्रँड लाँचिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 17:32 IST

देशभरात विविध सणउत्सवांची धूम सुरू होत असताना विविध वाहन उत्पादक कंपन्या ही उत्सवांची  बाजारपेठ काबीज करण्यासाठी त्यांच्या कारचे नवनवीन मॉडेल बाजारात आणण्याच्या तयारीत असताना महिंद्राने ‘मराझ्झो’ या प्रवसी श्रेणीतील कारचे दिमाखदार सादरीकरण केले असून, ही कार बाजारात ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.  

ठळक मुद्देमहिंद्राच्या नवीन मराझ्झो कारचे लॉचिंगप्रवासी वाहनांच्या श्रेणीत महिंद्राची स्पर्धा

नाशिक : सध्या देशभरात विविध सणउत्सवांची धूम सुरू होत असताना विविध वाहन उत्पादक कंपन्या ही उत्सवांची  बाजारपेठ काबीज करण्यासाठी त्यांच्या कारचे नवनवीन मॉडेल बाजारात आणण्याच्या तयारीत असताना महिंद्राने ‘मराझ्झो’ या प्रवसी श्रेणीतील कारचे दिमाखदार सादरीकरण केले असून, ही कार बाजारात ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.  सातपूर औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात सोमवारी (दि.३) महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा यांच्यासह व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोयंका, वाहन विभागाचे अध्यक्ष राजन वडेरा यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. महिंद्राची ‘मराझ्झो’ वेगवेगळ्या श्रेणीत सादर करण्यात आली असून, हिची किंमत नऊ लाख ९९ हजार ते १३ लाख ९० रुपयांपर्यंत असल्याचे कंपनीने यावेळी स्पष्ट केले. इको ड्रायव्हिंग मोड, लेदर सीट, टचस्क्रीन एन्फोऐंटेटंमेंट सिस्टीम अशा विविध सुविधा या कारमध्ये देण्यात आल्या आहेत. नाशिकमध्ये महिंद्राच्या कारखान्यात निर्मिती होणाºया बोलेरो, झायलो, स्कॉर्पिओ या वाहनांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असून, नव्याने येऊ घातलेल्या इलेक्ट्रिक कार ‘इ-व्हेरिटो’चे उत्पादनही नाशिकमध्ये वेगाने सुरू आहे. यात नव्या मरोझ्झोच्या निर्मितीमुळे नाशिकमधील वाहननिर्मिती प्रक्रियेला चालना मिळणार आहे. महिंद्राच्या नाशिकसह चेन्नई, अमेरिकेतील महिंद्रा आॅटोमोटिव्ह अमेरिका(माना) आणि महिंद्रा रिसर्च व्हॅली (एमआरव्ही), डेट्राइटची इंजिनिअरिंग टीम आणि इटलीच्या पिनिनफरीनाच्या संयुक्त प्रयत्नातून मराझ्झोच्या निर्मिती झाली आहे.

शार्क माशाप्रमाणे दिसणारी ‘मराझ्झो’ जलद आणि टिकावू असून, कुटुंबासाठी एक परिपूर्ण कार आहे, तिच्यातून सात ते आठ व्यक्ती आरामात प्रवास करू शकतात. सुरक्षा आणि आधुनिक तेच्या सर्वसुविधांनी युक्त ही कार शार्कप्रमाणेच दीर्घकाळ टिकणारी आणी चपळ असल्याची अनुभूती ग्राहकांना नक्कीच मिळेल- आनंद महिंद्रा, कार्यकारी अध्यक्ष, महिंद्रा अ‍ॅँड महिंद्रा लि.नाशिकमध्ये ‘मराझ्झो’च्या निर्मितीमुळे स्थानिक रोजगारातही भर पडणार आहे. नवीन वाहनांच्या निर्मितीसाठी वाढीव मन्युष्यबळासह पुरवठादारांचेही काम वाढणार असल्याने नाशिकमधील रोजगार निर्माण होण्यास मदत होणार असून, किमान २५ टक्के रोजगार वाढू शकेल. मराझ्झोच्या निर्मितीसाठी एकूण १४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक के ली आहे. -डॉ. पवन गोयंका, व्यवस्थापकीय संचालक, महिंद्रा अँड महिंद्रा लि. 

टॅग्स :carकारNashikनाशिकMahindraमहिंद्राbusinessव्यवसाय