शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांपासून ग्रामसेवकाची दांडी

By admin | Updated: August 8, 2014 00:53 IST

चार महिन्यांपासून ग्रामसेवकाची दांडी

 

पाथरे : नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या कोळगावमाळ ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक गेल्या चार महिन्यांपासून आला नसल्याची तक्रार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामसेवक नसल्याने गावाचा विकास खुंठला असून, विद्यार्थी व नागरिकांची विविध दाखल्यांसाठी अडचण निर्माण झाल्याचे चित्र आहे. गेल्या चार महिन्यांपासून ग्रामसेवक येत नसल्याने ग्रामस्थ, विद्यार्थी ग्रामपंचायत कार्यालयात विविध दाखले व उताऱ्यासाठी हेलपाटे मारत आहेत. सदर ग्रामसेवक कामावर येत नसल्याची लेखी तक्रार पंचायत समितीचे सभापती व गटविकास अधिकाऱ्यांकडे करूनही कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे सरपंच निवृत्ती कुमावत, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांचे म्हणणे आहे.कोळगावमाळ ग्रामपंचायतीत एस. एस. सोनवणेनामक ग्रामसेवक कार्यरत असून, त्याने ग्रामपंचायत कार्यालयातील महत्त्वाची रजिस्टर व कागदपत्रे घेऊन गेल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांना आवश्यक असणारी दाखले मिळत नाही. ग्रामसेवकाअभावी गावाचा विकास आराखडा तयार करता येत नाही. एकाही कामाचा प्रस्ताव नाही. शासकीय योजना व अनुदानापासून गाव वंचित असल्याची तक्रार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली आहे. ग्रामसेवक नसल्याने गावातील स्वच्छता व शासनामार्फत राबविले जाणारे विविध उपक्रम रखडले आहेत.एखाद्या ग्रामपंचायतीला चार महिने ग्रामसेवक नसेल तर पंचायत समिती प्रशासन व लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. तथापि, तसे केले जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. कोळगावमाळ ग्रामपंचायतीसाठी तातडीने ग्रामसेवक नियुक्त करण्याची मागणी सरपंच निवृत्ती कुमावत, वामन चंद्रे, नकुल पवार, अन्वर पटेल, अमिना पटेल, मीराबाई मोरे, ललिता कुमावत, प्रतिभा मोकळ, रवी भालेराव, कैलास मोकळ, सर्जेराव चंद्रे, छबूराव कदम, बाळासाहेब कदम आदिंसह ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)