शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत हायटेकसाठी ग्रामसेवकाची आडकाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:06 IST

ग्रामपंचायतींचा कारभार आता ‘हायटेक’ होत असल्याने या माध्यमातून गावागावांमध्ये आता ‘ग्लोबल व्हिलेज’ची सेवा सुरू झाली आहे. व्हीडीओ कॉन्फरन्सची सुविधादेखील पुढील काळात या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याचे चित्र असून, सरपंच ग्रामपंचायत कार्यालयातूनच थेट मंत्रालयाशी संपर्क साधणार असल्याने त्या दिशेने पावले उचलली जात असताना कळवण या आदिवासी तालुक्यातील धार्डेदिगर ग्रामपंचायत हायटेक करण्यासाठी चक्क ग्रामसेवकच आडकाठी करत असल्याची तक्रार उपसरपंच काशीनाथ बहिरम यांनी कळवण पंचायत समितीकडे केली आहे.

कळवण : ग्रामपंचायतींचा कारभार आता ‘हायटेक’ होत असल्याने या माध्यमातून गावागावांमध्ये आता ‘ग्लोबल व्हिलेज’ची सेवा सुरू झाली आहे. व्हीडीओ कॉन्फरन्सची सुविधादेखील पुढील काळात या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याचे चित्र असून, सरपंच ग्रामपंचायत कार्यालयातूनच थेट मंत्रालयाशी संपर्क साधणार असल्याने त्या दिशेने पावले उचलली जात असताना कळवण या आदिवासी तालुक्यातील धार्डेदिगर ग्रामपंचायत हायटेक करण्यासाठी चक्क ग्रामसेवकच आडकाठी करत असल्याची तक्रार उपसरपंच काशीनाथ बहिरम यांनी कळवण पंचायत समितीकडे केली आहे. ग्रामसेवकाच्या मनमानीमुळे धार्डेदिगर कार्यालय शोेचे बाहुले बनले आहे. धार्डेदिगर ग्रामपंचायत कार्यालयात कारभार हलविण्यात ग्रामसेवक राजी नसल्याने हायटेक सुविधांपासून ग्रामस्थांना वंचित रहाण्याची वेळ आली आहे. जुन्या ठिकाणांवरून ग्रामपंचायतीचे कामकाज सुरू असल्याने बहिरम यांनी गटविकासाधिकारी एम.डी. बहीरम यांच्याकडे तक्र ार दाखल केली आहे.पत्रव्यवहार नाहीजयदर येथून धार्डेदिगर ग्रामपंचायत कार्यालयासाठी आॅनलाइन केबल टाकण्याचे काम सुरू झाले असताना पाडगण (वरचापाडा) येथे काम थांबविण्यात आले. नाशिक येथील दूरसंचार कार्यालयाशी सदर कामासंदर्भात चौकशी केली असता, धार्डेदिगर ग्रामपंचायत कार्यालयांपर्यंत आॅनलाइन केबल टाकण्यासाठी ग्रामसेवकांचा पत्रव्यवहार नसल्याने काम पूर्ण करता येणार नसल्याचे संबधितांनी सांगितले.ग्रामपंचायत हायटेकचे फायदे ग्रामसभेचे कामकाज, यातील ठराव, सदस्य बैठक, प्रोसिडिंग बुकांची नोंद यासह दाखले, उतारेही तत्काळ मिळतात. ग्रामस्थांना उतारे, दाखले तत्काळ मिळतील व गाव इंटरनेटच्या माध्यमातून जिल्हा परिषदेशी जोडले जाईल. ग्रामस्थांची होणारी भटकंती यामुळे थांबणार असून, माहितीची देवाण-घेवाण करणे सोपे होते.