खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथे आमचं गाव, आमचा विकास’ आराखडा पंचायत समितीचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी व्ही. व्ही. सांवत यांच्या मार्गदर्शनाखाली तीनदिवसीय कार्यशाळा घेण्यात येऊन आराखडा तयार करण्यात आला. त्याचे ग्रामसभेत वाचन करण्यात येऊन मंजूर करण्यात आला.शासनाच्या १४व्या वित्त आयोगाअंतर्गत गावाच्या विकासासाठी येणारा निधी थेट ग्रामपंचायत कार्यालयास मिळणार असल्याने गाव पातळीवर विकासकामांचा पाच वर्षांचा विकास आराखडा तयार करण्याकरिता खामखेडा येथे तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामविकास व पंचायतराज विभागातर्फे आराखड्याच्या सूक्ष्म नियोजनास मशाल फेरी काढण्यात येऊन सुरुवात करण्यात आली. तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याचे वाचन करून त्यास ग्रामसभेच्या मंजुरीसाठी उपसरपंच संतोष मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालयात पाठविण्यात आले. ग्रामसेवक व्ही. व्ही. सोळसे यांनी आराखड्याचे वाचन केले. त्यात नागरिकांनी केलेल्या लक्षवेधी सूचनांचा समावेश करण्यात येऊन त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.सदर गाव विकास आराखडा तयार करण्यासाठी पंचायत समितीचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी व्ही. व्ही. सांवत यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच उखड्याबाई पवार, उपसरपंच संतोष मोरे, ग्रामसेवक व्ही. बी. सोळसे, वसाकाचे माजी संचालक अण्णा पाटील, माजी सरपंच शांताराम शेवाळे, सोसायटीचे अध्यक्ष विश्वास शेवाळे, नानाजी मोरे, सुनील शेवाळे, जिभाऊ बोरसे आदिंनी विशेष परिश्रम घेतले. (वार्ताहर)
ग्रामविकास आराखडा ग्रामसभेत मंजूर
By admin | Updated: July 14, 2016 00:33 IST