शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कामे पूर्ण केलेल्या ग्रामपंचायतींनाच नव्याने कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 01:40 IST

नाशिक : ग्रामपंचायतींची क्षमता नसतानाही अनेक कामे मंजूर केली जातात, परिणामी अनेक कामे वर्षांनुवर्षे रखडत असल्यामुळे यापुढे जुनी कामे ...

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा निर्णय । गटविकास अधिकाऱ्यांवर जबाबदारी

नाशिक : ग्रामपंचायतींची क्षमता नसतानाही अनेक कामे मंजूर केली जातात, परिणामी अनेक कामे वर्षांनुवर्षे रखडत असल्यामुळे यापुढे जुनी कामे पूर्ण केल्याशिवाय ग्रामपंचायतींना नवीन कामे मंजूर न करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. ग्रामपंचायतींना कामे मंजूर करण्यापूर्वी गटविकास अधिकाऱ्यांनी तशी खात्री केल्याशिवाय सक्षमता प्रमाणपत्र देऊ नये, असा ठरावही करण्यात आला.जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत आत्माराम कुंभार्डे यांनी सदरचा प्रश्न उपस्थित केला. ग्रामपंचायतींमार्फत करण्यात येणारी जनसुविधेची कामे जिल्हा नियोजन विकास समिती मंजूर करते व ग्रामपंचायत कामे करते. यात जिल्हा परिषदेचा काही संबंध नसला तरी, फक्त निधी वितरित जिल्हा परिषद करीत असल्याने सदरचा निधी खर्च न झाल्यास जिल्हा परिषदेच्या माथी खापर फुटते. सन २०१७-१८ मध्ये ग्रामपंचायतीने कामे न केल्यामुळे दहा कोटींचा निधी परत गेल्याने जिल्हा परिषदेची नाचक्की झाली असल्याचे कुंभार्डे यांनी सांगितले. अनेक ग्रामपंचायतींनी दोन कामे मंजूर असताना पुन्हा तिसरे कामही मंजूर झाले आहे. अशा ग्रामपंचायतींची आर्थिक सक्षमता नसतानाही निव्वळ कामे घेऊन रखडवली आहेत. अशा ग्रामपंचायतींना संबंधित गटविकास अधिकाºयांकडून सक्षमता प्रमाणपत्र दिले जाते, परंतु मागची कामे तपासली जात नसल्याचेही सभेत सांगितले. त्यामुळे यापुढे ज्या ग्रामपंचायतींनी पहिली दोन कामे पूर्ण केली नसतील तर त्यांना नवीन कामे दिली जाऊ नये, असा निर्णय घेण्यात आला व त्याची जबाबदारी गटविकास अधिकाºयांवर निश्चित करण्यात यावी, असा ठराव करण्यात आला.शिक्षकांची रिक्त पदे भरणारया सभेत महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर यांनी दोन दिवसांपूर्वी नांदगाव तालुक्यातील पांझण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या मागणीसाठी मोर्चा काढला. त्यामुळे शिक्षकांची रिक्त पदे का भरण्यात येत नाही, असा सवाल केला. यावर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी प्राथमिक शिक्षकांची ४४० पदे रिक्त असून, १४० मुख्याध्यापक व १९० पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नतीचा विषय येत्या आठवड्यात निकाली काढण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यावर शिक्षकांच्या पदांबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली असल्याची माहिती अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदgram panchayatग्राम पंचायत