शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायतीत महिलांचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:23 IST

नाशिक तालुक्यातील चांदशी, पिंपळद, दरी आणि राहुरी या चार ग्रामपंचायतींच्या २८ सदस्यपदांसह चार थेट सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले.

गंगापूर : नाशिक तालुक्यातील चांदशी, पिंपळद, दरी आणि राहुरी या चार ग्रामपंचायतींच्या २८ सदस्यपदांसह चार थेट सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये प्रस्थापितांना मोठा धक्का बसून नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली. या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांचा बोलबाला दिसून आला. प्रथमच थेट जनतेतून सरपंचपदी निवडून आलेल्यांमध्ये चांदशी- साळूबाई विश्राम कचरे (अनु. जमाती स्री), दरी- अलका अंबादास गांगोडे (अनु. जमाती स्री), पिंपळद (ना.)- अलका भाऊसाहेब झोंबाड (अनु. जमाती), राहुरी- संगीत संपतराव घुगे (सर्वसाधारण) याप्रमाणे चारही ग्रामपंचायतीत थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आले आहेत.चांदशी ग्रामपंचायतीत सदस्यपदी राहुल दौलत पाटील (ना. मा. प्रवर्ग), भगवान सदू धोंगडे (अनु. जमाती), अंजना नामदेव खराटे (अनु. जमाती स्री),परशराम हरी गारे (अनु. जमाती), म्हाळसाबाई हिरामण केंग (अनु. जमाती स्री), गोदावरी चैतन्य गायकर (सर्वसाधारण स्री), सोनाली योगेश कचरे (अनु. जमाती स्री), अरुण दगडू रोकडे (अनु. जाती), विमल हरीश गुळवे (सर्वसाधारण स्री) हे विजयी झाले. पिंपळद (ना.) ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून राजाराम नामदेव झोंबाड (अनु. जमाती), अरुण बालाजी खांडबहाले (सर्वसाधारण), साधना नितीन घोलप (सर्वसाधारण स्री), नारायण धर्मा पावडे (अनु. जमाती), गीता तानाजी चहाळे (अनु. जमाती स्री), संजय दशरथ पावडे (अनु. जमाती), संगीता अंकुश बेंडकुळे (अनु. जमाती स्री), निर्मला विलास कड (ना. मा. प्रवर्ग स्री), अश्विनी राजाराम झोंबाड (अनु. जमाती स्री), संजय भावका अनार्थे (सर्वसाधारण) गटातून निवडून आले आहेत.वर्चस्व : दिग्गजांनी गमावली पतनाशिक तालुक्यातील या चारही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पक्षीय चिन्हावर लढविल्या गेल्या नसल्याने कोणत्या पक्षाच्या ताब्यात सत्ता गेली याबाबत संभ्रमाचे चित्र आहे. असे असले तरी निकालाचा कल पाहिल्यास अनेक ग्रामपंचायतीत राजकीय उलथापालथ झाली आहे. मतमोजणीमध्ये अनेक दिग्गजांना आपली पत गमवावी लागली. तर काहींनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.निकालानंतर ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची मुक्त उधळण करीत जल्लोष केला गेला. सरपंचपदाचे उमेदवार पक्षाचे चिन्ह न घेता प्रथमच जनतेतून निवडून आल्याने ग्रामपंचायतीवर सत्ता नेमकी कुणाची, यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. नाशिकचे तहसीलदार अनिल दौंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी शांततेत पार पडली.या निवडणुकीवर लोकसभा अचारसंहितेचे सावट असल्याने अनेक ग्रामपंचायतींना विजयानंतर मिरवणूक काढता आली नाही; मात्र काही ठिकाणी मिरवणुकीद्वारे जल्लोष करण्यात आला.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतNashikनाशिक