शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वाळू लिलावाने ग्रामपंचायती होणार मालामाल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 14:06 IST

राज्यात वाळू माफियांकडून अधिकृत वाळूचा ठिय्या न घेता, चोरी छुप्या पद्धतीने वाळूचा उपसा केला जात असल्याच्या वाढत्या घटना पाहता, त्यातून शासनाचे कोट्यवधीचे नुकसान दरवर्षी होऊ लागले आहे. अशा परिस्थितीत

ठळक मुद्देशासनाचे नवे धोरण : २५ ते ६० लाखापर्यंत लिलावाचा हिस्सामहसुलापैकी १० ते २५ टक्क्यांपर्यंतची रक्कम ग्रामपंचायतीला देण्यात येणार

नाशिक: राज्य शासनाने वाळू लिलावासंदर्भात नवीन धोरण जाहीर केले असून, त्यात पुर्वीच्या सर्व तरतुदींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. गावातील वाळू लिलावांना ग्रामपंचायतींकडून होणारा विरोध लक्षात घेता, यापुढे वाळू ठिय्याच्या लिलावातून मिळणाºया रकमेतून ग्रामपंचायतींना रॉयल्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामपंचायतींना मिळणा-या रकमेतून विकास कामे तर करता येतील परंतु एखाद्या गावातील ठिय्याचा लिलाव न झाल्यास संबंधित ग्रामपंचायतीला सदरची वाळू विक्री करण्याची मुभाही देण्यात आल्याने नजिकच्या काळात ग्रामपंचायती मालामाल होणार आहेत.राज्यात वाळू माफियांकडून अधिकृत वाळूचा ठिय्या न घेता, चोरी छुप्या पद्धतीने वाळूचा उपसा केला जात असल्याच्या वाढत्या घटना पाहता, त्यातून शासनाचे कोट्यवधीचे नुकसान दरवर्षी होऊ लागले आहे. अशा परिस्थितीत वाळूची चोरी रोखण्यापासून ते लिलावाची पद्धती पर्यंत साºयाच तरतुदींचा अभ्यास करून शासनाने नवीन धोरण जाहीर केले आहे. त्यात प्रामुख्याने गाव पातळीवरील वाळू ठिय्याच्या लिलावास ग्रामपंचायतींकडून होणारा विरोध पाहता, पुर्वीच्या तरतुदीनुसार वाळू ठिय्यास परवानगी देण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव आवश्यक असल्याचे म्हटले आहे. ग्रामपंचायतींनी मुदतीत ठराव न दिल्यास त्यांची मुक संमती गृहीत धरून वाळू ठिय्याचा लिलाव केला जाणार असून, अशा ठिय्यातून मिळणा-या शासनाला महसुलापैकी १० ते २५ टक्क्यांपर्यंतची रक्कम ग्रामपंचायतीला देण्यात येणार आहे. मात्र ज्या ग्रामपंचायतीने वाळू ठिय्याच्या लिलावास ना हरकत न दिल्यास अशा ठिय्याचा लिलाव केला जाणार नाही असे धोरण शासनाने स्विकारण्याबरोबरच मात्र ग्रामपंचायतीमुळे लिलाव न झालेल्या ठिय्यातून अवैध वाळू उपसा होणार नाही याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर टाकण्यात आली असून, त्यांनी वाळू रक्षणाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. अवैध उपसा होणार असेल तर त्याची माहिती ग्रामपंचायतीने तहसिलदार, जिल्हाधिकाºयांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक