शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वाळू लिलावाने ग्रामपंचायती होणार मालामाल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 23:47 IST

नाशिक : राज्य शासनाने वाळू लिलावासंदर्भात नवीन धोरण जाहीर केले असून, त्यात पूर्वीच्या सर्व तरतुदींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. गावातील वाळू लिलावांना ग्रामपंचायतींकडून होणारा विरोध लक्षात घेता, यापुढे वाळू ठिय्याच्या लिलावातून मिळणाºया रकमेतून ग्रामपंचायतींना रॉयल्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामपंचायतींना मिळणाºया रकमेतून विकासकामे तर करता येतील, परंतु एखाद्या गावातील ठिय्याचा लिलाव न झाल्यास संबंधित ग्रामपंचायतीला सदरची वाळू विक्री करण्याची मुभाही देण्यात आल्याने नजीकच्या काळात ग्रामपंचायती मालामाल होणार आहेत.

ठळक मुद्देशासनाचे नवे धोरण : २५ ते ६० लाखांपर्यंत लिलावाचा हिस्साचोरी छुप्या पद्धतीने वाळूचा उपसा

नाशिक : राज्य शासनाने वाळू लिलावासंदर्भात नवीन धोरण जाहीर केले असून, त्यात पूर्वीच्या सर्व तरतुदींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. गावातील वाळू लिलावांना ग्रामपंचायतींकडून होणारा विरोध लक्षात घेता, यापुढे वाळू ठिय्याच्या लिलावातून मिळणाºया रकमेतून ग्रामपंचायतींना रॉयल्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामपंचायतींना मिळणाºया रकमेतून विकासकामे तर करता येतील, परंतु एखाद्या गावातील ठिय्याचा लिलाव न झाल्यास संबंधित ग्रामपंचायतीला सदरची वाळू विक्री करण्याची मुभाही देण्यात आल्याने नजीकच्या काळात ग्रामपंचायती मालामाल होणार आहेत.राज्यात वाळू माफियांकडून अधिकृत वाळूचा ठिय्या न घेता, चोरी छुप्या पद्धतीने वाळूचा उपसा केला जात असल्याच्या वाढत्या घटना पाहता, त्यातून शासनाचे कोट्यवधींचे नुकसान दरवर्षी होऊ लागले आहे. अशा परिस्थितीत वाळूची चोरी रोखण्यापासून ते लिलावाची पद्धतीपर्यंत साºयाच तरतुदींचा अभ्यास करून शासनाने नवीन धोरण जाहीर केले आहे. त्यात प्रामुख्याने गावपातळीवरील वाळू ठिय्याच्या लिलावास ग्रामपंचायतींकडून होणारा विरोध पाहता, पूर्वीच्या तरतुदीनुसार वाळू ठिय्यास परवानगी देण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव आवश्यक असल्याचे म्हटले आहे. ग्रामपंचायतींनी मुदतीत ठराव न दिल्यास त्यांची मूक संमती गृहीत धरून वाळू ठिय्याचा लिलाव केला जाणार असून, अशा ठिय्यातून मिळणाºया शासनाला महसुलापैकी १० ते २५ टक्क्यांपर्यंतची रक्कम ग्रामपंचायतीला देण्यात येणार आहे. मात्र ज्या ग्रामपंचायतीने वाळू ठिय्याच्या लिलावास ना हरकत न दिल्यास अशा ठिय्याचा लिलाव केला जाणार नाही, असे धोरण शासनाने स्वीकारण्याबरोबरच मात्र ग्रामपंचायतीमुळे लिलाव न झालेल्या ठिय्यातून अवैध वाळू उपसा होणार नाही याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर टाकण्यात आली असून, त्यांनी वाळू रक्षणाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. अवैध उपसा होणार असेल तर त्याची माहिती ग्रामपंचायतीने तहसीलदार, जिल्हाधिकाºयांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे.वाळू ठिय्यांवर बसणार कॅमेरेनवीन धोरणानुसार वाळू ठिय्याचा लिलाव झाल्यास वाहतूकदाराने ठरवून दिलेल्या एकाच मार्गावरून वाळूची वाहतूक करावी तसेच ज्या ठिकाणाहून वाळू उपसा केला जाईल त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे तसेच उपसा केलेली वाळू ज्या डेपोेत संकलित केली जाईल तेथेही कॅमेरे बसविणे क्रमप्राप्त करण्यात आले आहे. मात्र ज्या वाळू ठिय्याचा लिलाव झालेला नाही अशा ठिय्यांमधून वाळू उपसा होऊ नये म्हणून जिल्हाधिकाºयांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत.