शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीच्या जागा ४९५, अर्ज फक्त ३४०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:04 IST

  नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने नामांकन भरण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देऊनही एकूण रिक्त असलेल्या ४९५ जागांसाठी फक्त ३४० अर्ज प्राप्त झाले असून, त्यातही एकेका उमेदवाराने एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केल्याने नामांकनाअभावी रिक्त राहणाºया पदांसाठी पुन्हा पोटनिवडणूक घेण्याची वेळ आल्याचे स्पष्ट झाले आहे.मार्च ते मे या कालावधीत मुदत ...

ठळक मुद्देबुधवारी छाननी रिक्त पदांसाठी पुन्हा निवडणूक

 

 

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने नामांकन भरण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देऊनही एकूण रिक्त असलेल्या ४९५ जागांसाठी फक्त ३४० अर्ज प्राप्त झाले असून, त्यातही एकेका उमेदवाराने एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केल्याने नामांकनाअभावी रिक्त राहणाºया पदांसाठी पुन्हा पोटनिवडणूक घेण्याची वेळ आल्याचे स्पष्ट झाले आहे.मार्च ते मे या कालावधीत मुदत संपणाºया ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर करून त्यासाठी दि. ५ ते १० फेब्रुवारीदरम्यान नामांकन दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती; परंतु या मुदतीत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारच पुढे न आल्याने त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करता यावे म्हणून सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. परंतु या मुदतीतही पाहिजे त्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लोकांचा उत्साह दिसून आला नाही.जिल्ह्यातील २७८ ग्रामपंचायतींतील ४९५ पदे रिक्त असून, त्यासाठी सोमवार अखेर फक्त ३४० अर्ज आले आहेत. त्यातही काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले असल्यामुळे रिक्त पदांपेक्षाही कमी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी या अर्जांची छाननी केली जाणार असून, माघारी नंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची रिक्त पदांची संख्या पाहता नजीकच्या काळात पुन्हा फेरनिवडणुकीचा कार्यक्रम घ्यावा लागणार आहे. मतदार व उमेदवारांची उदासिनता व राखीव जागांवर निवडणूक लढविणाºयांना जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याचे बंधन याच कारणामुळे वर्षानुवर्षे काही ग्रामपंचायतींची पदे रिक्त आहेत.