शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी गोविंद लोखंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 18:22 IST

शिवसेनेचे बहुमत : अपेक्षेनुसार लोखंडे यांची बिनविरोध निवड

ठळक मुद्देभाजपा गटनेते नामदेव लोंढे यांनी निवडीचे स्वागत केले.

सिन्नर : येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेना नगरसेवक गोविंद लोखंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगरपरिषदेत शिवसेनेचे बहुमत असून अपेक्षेनुसार लोखंडे यांची बिनविरोध निवड पार पडली.उपनगराध्यक्ष शैलेश नाईक यांनी सहकारी नगरसेवकांना उपनगराध्यक्षपदाची संधी मिळावी यासाठी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त जागेसाठी निवडणूक जाहीर झाली होती. शुक्रवारी नगराध्यक्ष तथा पीठासन अधिकारी किरण डगळे यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली.शुक्रवारी सकाळी मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांच्याकडे गोविंद लोखंडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. लोखंडे यांच्या अर्जावर सूचक म्हणून शिवसेनेचे गटनेते हेमंत वाजे तर अनुमोदक म्हणून नगरसेवक बाळासाहेब उगले यांनी स्वाक्षरी केली होती. निर्धारित वेळेत लोखंडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने पीठासन अधिकारी डगळे यांनी बिनविरोध निवड जाहीर केली. भाजपा गटनेते नामदेव लोंढे यांनी निवडीचे स्वागत केले. नवनिर्वाचित नगराध्यक्ष डगळे यांच्याहस्ते नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, उपनगराध्यक्ष निवडीनंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या हस्ते लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक