शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने  ठोस भूमिका घ्यावी : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:52 IST

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने ठोस भूमिका स्पष्ट केली पाहिजे. केवळ प्रसिद्धीसाठीची विधाने करणे सरकारला शोभणारे नाही, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्टय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. सरकार नेमके काय करणार याची स्पष्टता नसल्याने मुख्यमंत्र्यांनी बोलविलेल्या बैठकीस जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

नाशिक : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने ठोस भूमिका स्पष्ट केली पाहिजे. केवळ प्रसिद्धीसाठीची विधाने करणे सरकारला शोभणारे नाही, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्टय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. सरकार नेमके काय करणार याची स्पष्टता नसल्याने मुख्यमंत्र्यांनी बोलविलेल्या बैठकीस जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.  वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणासंदर्भात त्यांना विचारले असता मराठा आरक्षणाकडे सरकार गांभीर्याने पाहत नसल्याने त्यांची भूमिका कळत नसल्याचे म्हटले. सरकारने अगोदर भूमिका जाहीर केली पाहिजे. आरक्षण देण्याची तयारी असल्याचे सरकार म्हणत असले तरी हे केवळ सवंग प्रसिद्धीसाठी केलेले विधान असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. कोणत्या निकषावर आरक्षण देता येऊ शकते, याबाबत मराठा कार्यकर्त्यांचा विश्वास हा मराठा नेत्यांवर आहे. त्यामुळे इतर कुणी याबाबत स्पष्ट भूमिका मांडत नाही. कुणी अशी भूमिका मांडली तर त्यावर लागलीच ‘रियॅक्शन’ येऊ शकेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सायमन कमिशन समोर मांडलेला ‘मागासलेपण’ यावरूनच पुढे आरक्षणाची रेघ ओढता येऊ शकते, असा बचावात्मक पवित्रा घेत आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडली.  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आमदारांनी दिलेले राजीनामे हे निव्वळ नौटंकी आहे, अशा शब्दात राजीनामा नाट्यावर टीका केली तर आर्थिक निकषावर आरक्षण दिले पाहिजे असे म्हणणाऱ्या राज ठाकरे यांना आपण फारसे महत्त्व देत नसल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.शरद पवार यांचे विधान खूष करण्यासाठीराष्टÑवादीचे नेते शरद पवार यांनी घटनेत दुरुस्ती झाली पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. परंतु घटनेत नेमकी कोणती दुरुस्ती करावी, हे त्यांनी स्पष्ट केले असते तर त्यावर चर्चा होऊ शकली असती अन्यथा मराठा समाजाला खूष करण्यासाठीचे विधान एवढाच त्याचा अर्थ काढता येऊ शकतो, असा टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर