शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने दुष्काळी योजनांची तातडीने अंमलबजावणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 18:48 IST

सिन्नर : तालुक्यासह इगतपुरी तालुक्यातील टाकेद मंडळात सरासरीपेक्षाअत्यल्प पर्जन्यमान झाले असून तेथे दुष्काळ जाहीर करून तातडीने दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी ...

सिन्नर : तालुक्यासह इगतपुरी तालुक्यातील टाकेद मंडळात सरासरीपेक्षाअत्यल्प पर्जन्यमान झाले असून तेथे दुष्काळ जाहीर करून तातडीने दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आमदार राजाभाऊ वाजे यांनी सिन्नर दौऱ्यावर आलेल्या मृद व जलसंधारण मंत्री राम शिंदे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.यावर्षी तालुक्यात भयंकर दुष्काळी परिस्थिती उद्भवली असून पिण्याच्या पाण्याचे भीषण दुर्भिक्ष जाणवत आहे. शासनाने पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी वेळेवर मिळावे यासाठी टॅँकर मंजुरीचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्याची मागणी निवेदनात केली आहे. जिल्हाधिकारी ऐवजी तहसीलदारांना सदरचे आधिकार देण्यात याव त्यामुळे विनाविलंब टॅँकर मंजुरी करणे शक्य होईल असेही निवेदनात म्हटले आहे. तसेच माणसांसोबत जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. जनावरांच्या चाºयाची समस्या अवघड बनली असून चारा डेपो किंवा छावण्या सुरू कराव्यात, शेतीची कामे नसल्याने बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असून रोहयो मार्फत तातडीने रोजगार हमीची कामे उपलब्ध करावी. इगतपुरी तालुक्यातील भातपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत, सक्तीची कर्जवसुली थांबवावी, वीज बिलांची सक्ती न करता शेतकºयांना अखंडीत वीजपुरवठा करावा. तसेच सिन्नर मतदारसंघात तातडीने दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आमदार वाजे यांनी निवेदनात केली आहे.दुष्काळाच्या कठीण समयी शासन राज्यातील जनतेसोबत असून लवकरच दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन जलसंधारण मंत्री शिंदे यांनी आमदार वाजे यांना यावेळी दिले.

टॅग्स :Farmerशेतकरी