शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सरकार, उघड आता देवाचे द्वार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 17:16 IST

त्र्यंबकेश्वर : श्रावणमास सुरू होऊनही राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार मंदिरे खुली करीत नसल्याच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने साधू-महंतांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर रस्त्यावरच रूद्राभिषेक तसेच घंटा-शंखनाद करीत आंदोलन करण्यात आले. ह्यमंदिर बंद, उघडले बार, उद्धवा...धुंद तुझे सरकारह्ण असे फलक झळकावत व शासनाचा निषेध करीत यावेळी निदर्शने करण्यात आली. दरम्यान, त्र्यंबकेश्वर शहरात पोलिसांकडून संचारबंदी लागू करण्यात आली असून भाविकांना मंदिर परिसरात गर्दी करण्यास मनाई केली जात आहे.

त्र्यंबकेश्वर : श्रावणमास सुरू होऊनही राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार मंदिरे खुली करीत नसल्याच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने साधू-महंतांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर रस्त्यावरच रूद्राभिषेक तसेच घंटा-शंखनाद करीत आंदोलन करण्यात आले. ह्यमंदिर बंद, उघडले बार, उद्धवा...धुंद तुझे सरकारह्ण असे फलक झळकावत व शासनाचा निषेध करीत यावेळी निदर्शने करण्यात आली. दरम्यान, त्र्यंबकेश्वर शहरात पोलिसांकडून संचारबंदी लागू करण्यात आली असून भाविकांना मंदिर परिसरात गर्दी करण्यास मनाई केली जात आहे.कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून राज्यातील धार्मिक स्थळे बंद आहेत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना सर्व मंदिरे खुली करण्यात यावीत यासाठी भाजपाने यापूर्वी वारंवार आंदोलन केली आहेत. आता श्रावणमास सुरू झाल्याने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराचे दरवाजे भाविकांना खुले करण्यात यावेत, या मागणीसाठी भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंदिराच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यावरच ठाण मांडत रुद्राभिषेक करीत सरकारला सुबुद्धी सुचावी याकरीता त्र्यंबकराजाला प्रार्थना करण्यात आली. याचवेळी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. शंख व घंटानाद करीत सरकारचे मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात महिलावर्गही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाला होता. पंचायती आनंद अखाड्याचे सचिव तथा अखिल भारतीय अखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष श्रीमहंत शंकरानंद सरस्वती यांनी सांगितले, एकाच देशात काही राज्यात मंदिरे, धार्मिक स्थळे खुली आहेत तर महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे बंद आहेत. ही कुठली अराजकता आहे? सर्व लोक मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने मंदिर बंद केल्याचे सांगतात. त्यांचे पिताश्री कायम भगवे वस्त्र परिधान करून हिंदू धर्माचे समर्थन करत होते. पण उद्धव ठाकरे यांनी ऐन श्रावण महिन्यात देखील प्रार्थना स्थळे कोविडच्या नावाखाली बंद करून ठेवली आहेत, असे सांगत श्रीमहंत शंकरानंद सरस्वती यांनी संचारबंदीलाही आक्षेप घेतला. दरम्यान, पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी मंदिराबाहेर गर्दी केली होती. यावेळी पोलिसांनी बॅरिकेडींग केल्याने भाविक व पोलिसांत वादविवादाचेही प्रसंग पाहायला मिळाले. गावात संचारबंदी लागू केली असली तरी सर्व दुकाने सुरू होती.--------------------भारतातील अनेक राज्यातील धार्मिक स्थळे उघडली असतांना महाराष्ट्र सरकार धार्मिक, प्रार्थना स्थळे उघडण्यास परवानगी का देत नाही? बियर बार, दारू दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाते, मंदिरे नाही. हा अन्याय सहन केला जाणार नाही. श्रावण महिना म्हणजे हिंदू धर्मातील सर्वात जास्त सणावारांचा, व्रत वैकल्याचा महिना असतांना निदान श्रावण महिन्यात तरी मंदिर उघडेल अशी अपेक्षा होती. पण महाराष्ट्र सरकार हिंदुत्व विरोधी असल्याचे यातून स्पष्ट होते.- आचार्य तुषार भोसले, प्रमुख, भाजपा अध्यात्मिक आघाडी

टॅग्स :Nashikनाशिक