शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालये, संस्थामध्ये उरले लॅडलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 17:23 IST

कळवण : एकेकाळी गावात संपर्काचे अत्यंत महत्वाचे साधन असलेल्या लॅन्डलाईन (दूरध्वनी) यंत्रणा मोबाईलमुळे उतरती कळा लागली असून लॅन्डलाईन आता केवळ शासकीय कार्यालये, संस्था पुरताच मर्यादित राहिला आहे.

ठळक मुद्देकळवण : दूरसंचार सेवेकडे दुर्लक्ष ; नवीन जोडणीला केबल नाही

कळवण : एकेकाळी गावात संपर्काचे अत्यंत महत्वाचे साधन असलेल्या लॅन्डलाईन (दूरध्वनी) यंत्रणा मोबाईलमुळे उतरती कळा लागली असून लॅन्डलाईन आता केवळ शासकीय कार्यालये, संस्था पुरताच मर्यादित राहिला आहे.कळवण व देवळा तालुक्यात आजमितीस केवळ हजाराच्या आसपास दूरध्वनी कनेक्शन शिल्लक आहे. नवीन दूरध्वनी जोडण्याची मागणी आहे, परंतु केबल नसल्याने जोडण्या देखील बंद आहेत. संपर्काचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणून दूरसंचार सेवेला प्राधान्य दिले जात असले तरी या महत्वपूर्ण सेवेकडे केंद्र शासनाचे दुर्लक्ष झाले आहे.अलीकडे प्रत्येकांच्या हाती मोबाईल आल्यामुळे लँडलाईन कालबाह्य होणार का ? अशी भीती वाटते. मात्र आता हा आकडा वाढू लागला आहे. लँडलाईन वापरणे म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात आहे.शासकीय कार्यालयांमध्ये तसेच ज्या व्यक्ती वा संस्थेला ब्रॉडबँडची गरज आहे, अशा व्यक्तीला व संस्थेला लॅन्डलाईनचा क्र मांक, केबल घेणे आवश्यक असल्याने संबंधित कार्यालयात दूरध्वनीसेवा आढळून येते. घरामधून मात्र दूरध्वनी सेवा जवळपास गायबच झाले असल्याचे चित्र दिसून येते.बीएसएनएलसह खासगी कंपन्यांनी ग्रामीण भागात टॉवर उभारून सेवा उपलब्ध करून दिली. दूरध्वनीच्या तुलनेत मोबाईलचा वापर करणे सहज शक्य झाले. मोबाईलमुळे संबंधित व्यक्तीला कधीही संपर्क साधता येत असल्याने मोबाईल सेवा देण्यात अनेक खासगी कंपन्या उतरल्या. त्यामुळे त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण होऊन अत्यंत कमी दरात मोबाईल सेवा उपलब्ध होत आहे. परिणामी नागरिकांनी दूरध्वनी सेवेकडे दुर्लक्ष केले आहे. ज्यांच्याकडे दूरध्वनीसेवा होती, त्यांनी सुद्धा आता ही सेवा बंद केली आहे.केबल नसल्याने जोडण्या बंद -केंद्र सरकार ‘डिजीटल इंडिया’चे स्वप्न पाहात असताना सरकारच्या अखत्यारित काम करणारी बीएसएनएल ही कंपनी मात्र आपल्या सेवेने सरकारच्या योजनांना धुळीस मिळवत आहे. कळवण विभागात गेल्या काही महिन्यांपासून केबल वाहिनी नसल्याने ग्राहकांना नवीन दूरध्वनी जोडण्या देणे बंद करण्यात आल्या आहे. त्यामुळे केवळ केबल नसल्याने बीएसएनएलचा विस्तार करणे कठीण होऊन बसले आहे.आदीवासी भागात इंटरनेटचा बोजवारा-आदीवासी बहुल कळवण तालुक्यात इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत असल्याने हा तालुका सध्या आधुनिकीकरणापासून दूर चालला आहे. एकेकाळी बीएसएनएल लँडलाईन तसेच सिमकार्ड वापरणाऱ्यांची संख्या मोठी होती. ब्रॉण्डबॅण्ड सेवेत महिन्यात पंधरा दिवस बिघाड होतो. त्यामुळे तालुक्यात लिंकअभावी शासकीय, निमशासकीय कार्यालये व बँकांचे कामकाज बºयाच वेळा ठप्प होते.बीएसएनएलच्या मोबाईल सेवेची हीच अवस्था आहे. टेलिफोनप्रमाणे या कंपनीचे ग्राहक खासगी कंपन्यांकडे वळाले आहेत. इंटरनेटचा वापर करता यावा म्हणून ब्रॉडबॅन्ड सेवेसाठी बीएसएनएलची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. आता ती खासगी कंपनीद्वारे तत्काळ सेवेमुळे कमी झाली आहे.