शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

पर्यटनपुरक व्यवसायाला मिळणार शासकिय कर्ज; पर्यटनाला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 20:22 IST

सरकारच्या वतीने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून इच्छुकांना अर्थसहाय्यही उपलब्ध असल्याचे प्रतिपादन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सुनील काचे यांनी केले.

ठळक मुद्दे ५० हजारापासून तर पाच लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकतेराज्य शासनाच्या विविध महामंडळांच्या माध्यमातून गरजू प्रशिक्षणार्थ्यांना तसेच व्यवसाय इच्छेुकांना शासकीय क र्ज सुविधामहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून इच्छुकांना अर्थसहाय्यही उपलब्ध

नाशिक : सुशिक्षित बेरोजगार असलेल्या तरुणांना पर्यटन व्यवसायात रोजगाराला वाव आहे. ट्रॅव्हल्स व्यवसाय हा पर्यटनाला पूरक असा असून, या व्यवसायासाठी सरकारच्या वतीने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून इच्छुकांना अर्थसहाय्यही उपलब्ध असल्याचे प्रतिपादन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सुनील काचे यांनी केले.जागतिक पर्यटन दिनानिमित्त ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन आॅफ नाशिक व ईजी सोल्युशन अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पर्यटन : विकास व संधी’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (दि.२७) मखमलाबाद रस्त्यावरील ग्रीन लॅन्ड रिसॉर्ट येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी पाहुणे म्हणून व्यासपीठावर पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे, महाराष्टÑ कौशल्य व उद्योजकता विकास संचलनालयाचे उपसंचालक सुनील सैंदाणे, सारंगखेड्याचे सरपंच जयपाल रावल उपस्थित होते. यावेळी काचे म्हणाले, राज्य शासनाच्या विविध महामंडळांच्या माध्यमातून गरजू प्रशिक्षणार्थ्यांना तसेच व्यवसाय इच्छेुकांना शासकीय क र्ज सुविधा उपलब्ध आहेत. याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, कर्ज प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केले. लाभार्थ्यांना ५० हजारापासून तर पाच लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकते. याकरिता प्रकल्प अहवाल, व्यावसायिकता, प्रामाणिकपणा, जिद्द-चिकाटी आदिंची गरज असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, मुंडावरे यांनी राज्य पर्यटन महामंडळाकडून राज्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. ‘तान’चे दत्ता भालेराव यांनी ‘नाशिक : कृषी पर्यटनाच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांना पर्यटन अभ्यासक्रम, व्यक्तिमत्त्व विकास, संभाषण कौशल्य, पर्यटनाचे धडे देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरुणाईला योग्य दिशा दाखविल्यास बेरोजगारीला आळा बसेल, असे अकादमीचे प्रशिक्षक सागर धर्माधिकारी यांनी सांगितले. जयेश तळेगावकर यांनी वाइन पर्यटन याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी विविध राज्यांमधील पोशाख परिधान करून विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती.