शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचा आॅनलाइन झोल; अपात्र सदस्यांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:37 IST

शासकीय मानसिकतेचे अनेकजण बळी ठरत असतानाच शासनाच्या अजब कारभाराचेही नमुने समोर येत असतात. त्याचाच एक नमुना बुचकळ्यात पाडणारा ठरला आहे. दोन वर्षांपूर्वी शौचालय नसल्याच्या कारणावरून सिन्नर तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले होते. मात्र, आता त्याच सदस्यांना आपले पद अबाधित ठेवण्यासाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची नोटीस मिळाल्याने शासनाचा हा आॅनलाइन झोल चांगलाच चर्चेत आला आहे.

ठळक मुद्देजातवैधता प्रमाणपत्राची मागणी । नायगावकर बुचकळ्यात

दत्ता दिघोळे। लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव : शासकीय मानसिकतेचे अनेकजण बळी ठरत असतानाच शासनाच्या अजब कारभाराचेही नमुने समोर येत असतात. त्याचाच एक नमुना बुचकळ्यात पाडणारा ठरला आहे. दोन वर्षांपूर्वी शौचालय नसल्याच्या कारणावरून सिन्नर तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले होते. मात्र, आता त्याच सदस्यांना आपले पद अबाधित ठेवण्यासाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची नोटीस मिळाल्याने शासनाचा हा आॅनलाइन झोल चांगलाच चर्चेत आला आहे.नायगाव ग्रामपंचायतीच्या गत पंचवार्षिक निवडणुकीनंतर प्रशांत तुळशीराम डोंगरे, इंदुमती नामदेव जाधव आणि मंगल चंद्रभान पिंगळे या तीन सदस्यांना शौचालय नसल्याचे कारण देत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी अपात्र घोषित केले होते. अपात्र ठरलेल्या या सदस्यांना तब्बल दोन वर्षांनंतर शासनाच्या वतीने दि. २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत जातवैधता प्रमाणपत्र सिन्नर तहसील कार्यालयात सादर करण्याची नोटीस जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बजाविण्यात आली आहे. त्यामुळे हे सदस्य बुचकळ्यात पडले आहेत.दोन वर्षांपूर्वी नायगाव ग्रामपंचायतीचे तीन सदस्य अपात्र ठरल्यानेराजकीय संख्याबळ बिघडले होते. त्यामुळे सत्ता टिकविण्यासाठी दोन्ही गटांमध्येचुरस निर्माण होऊन या तीनही जागी भीमा नाना जाधव, सुनीता भाऊसाहेब पिंपळे व मंदा काशीनाथ बर्डे या नवीन सदस्यांची निवड झाली होती. ग्रामपालिकेचा कारभारही सुरू आहे. अशातच दोन वर्षांपूर्वी अपात्र ठरलेल्या तीनही सदस्यांना आपले सदस्यपद अबाधित ठेवण्यासाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची नोटीस हाती पडल्याने अपात्र ठरलेले सदस्यही अचंबित झाले आहेत.तंत्रज्ञानाच्या काळात सर्वच विभागांचा कारभार आॅनलाइन झाल्याचाडांगोरा सरकार पिटत आहे. अशा काळात ज्या कार्यालयाने दोन वर्षांपूर्वी अपात्र ठरलेल्या सदस्यांना पुन्हा त्याच जिल्हाधिकारी कार्यालयाने आपले पद कायम ठेवण्यासाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अजब नोटीस दिल्याने शासनाच्या बारभाई कारभाराचे उदाहरण समोर आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार