शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या घरांबाबतचा निर्णय; एकलहरे ग्रामसभेत स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:55 IST

शासकीय जागेवरील अतिक्रमित घरे नियमानुसार कायम करण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयाचे एकलहरे ग्रामसभेत वाचन करून सर्वांना माहिती देण्यात आली.

एकलहरे : शासकीय जागेवरील अतिक्रमित घरे नियमानुसार कायम करण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयाचे एकलहरे ग्रामसभेत वाचन करून सर्वांना माहिती देण्यात आली. एकलहरे ग्रामसभा गुरुवारी सरपंच मोहिनी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सन २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ या धोरणात्मक निर्णयानुसार वर्षानुवर्षे २०११ पर्यंत शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या रहिवाशांना त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचा धोरणात्मक निर्णय ग्रामविकास मंत्रालयाने घेतला आहे. त्या निर्णयाचे ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी एस. जी. वाघ यांनी वाचन केले. एकलहरे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सिद्धार्थनगर वस्ती पाटबंधारे खाते व महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीच्या संयुक्त जागेवर गेल्या ५० वर्षांपासून अस्तित्वात आहे. ग्रामविकास मंत्रालयाच्या शासकीय जागेवरील २०११ पर्यंतची घरे नियमानुसार करण्याचा निर्णयान्वये सिद्धार्थनगरमधील रहिवाशांना घरे व मूलभूत सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाच्या आदेशानुसार सिद्धार्थनगरमधील ७२९ पात्र अतिक्रमणधारकांची यादी ग्रामसभेत प्रसिद्ध करण्यात आली. ग्रामसभेला जिल्हा परिषद सदस्य शंकरराव धनवटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे, पंचायत समिती सदस्य विजय जगताप, उपसरपंच अशोक पवळे, ग्राम पंचायत सदस्य श्रीमान होलीन, नीलेशधनवटे, विश्वनाथ होलीन, सुरेखा जाधव दिलीप जाधव, आदींसह ग्रामस्थ, महिला उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन आसाराम शिंदे व आभार सागर जाधव यांनी मानले.शासकीय जागेवरील अतिक्रमणामुळे ग्रामपंचायतीला सिद्धार्थनगर परिसरात शासकीय योजना, विकासकामे करता येत नव्हती. महाराष्ट्र शासनाच्या अतिक्र मण नियमानुसार करावयाच्या धोरणात्मक निर्णयामुळे सिद्धार्थनगर येथे घरकुल योजनेसहित विविध विकासकामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. - मोहिनी जाधव, सरपंच एकलहरे ग्रामपंचायत

टॅग्स :Governmentसरकारgram panchayatग्राम पंचायतNashikनाशिक