शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सरकारी अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:06 IST

भगूरचे भूमिपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनानिमित्त सोमवार, दि. २८ रोजी शासकीय कार्यालयांमध्ये त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश सामान्य प्रशासन विभागाने सर्वच शासकीय कार्यालयांना प्राप्त झाले आहेत.

नाशिक : भगूरचे भूमिपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनानिमित्त सोमवार, दि. २८ रोजी शासकीय कार्यालयांमध्ये त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश सामान्य प्रशासन विभागाने सर्वच शासकीय कार्यालयांना प्राप्त झाले आहेत.  राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून, अशाप्रकारे पहिल्यांदाच शासनाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शासकीय कार्यालयांमध्ये अभिवादन करण्यात येणार आहे. या संदर्भात सावरकर प्रेमींकडून राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत होता. त्याचीच शासनाने दखल घेऊन आता यापुढे सर्वच राष्टÑपुरुषांप्रमाणे सावकर यांनाही जयंती दिनी अभिवादन करण्यात येणार आहे. सावरकर यांचे अस्सल छायाचित्र उपलब्ध करण्याबाबत राज्य सरकारकडून अनेक ठिकाणी प्रयत्न करण्यात आले. अखेर जिल्हा प्रशासनाने सावरकर यांच्या मूळ जन्मगाव असलेल्या भगूर येथे त्यांच्या वाड्यात लावलेले छायाचित्र पसंत करण्यात आले. या छायाचित्रावर सावरकर यांच्या कुटुंबीयांच्या सत्यप्रत असल्याबद्दल स्वाक्षऱ्या आहेत. हेच छायाचित्र शासनाला पाठविण्यात आले आहे.छायाचित्र उपलब्धविशेष म्हणजे राज्य सरकारकडून सावरकर यांची जयंती साजरी करण्यासाठी त्यांचे छायाचित्र नाशिकच्या जिल्हा प्रशासनाने सामान्य प्रशासन विभागाला उपलब्ध करून दिले असून, तेच छायाचित्र आता सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये जयंतीदिनी वापरण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक