शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनाला शासनाकडून ५० लाख रुपयांचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 01:09 IST

शहरात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दिनांक २६ ते २८ मार्चदरम्यान हे संमेलन नाशिक येथे गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होत असून, ज्येष्ठ विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

नाशिक : शहरात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दिनांक २६ ते २८ मार्चदरम्यान हे संमेलन नाशिक येथे गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होत असून, ज्येष्ठ विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. हे संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे आयोजित करण्यात येत असून, लोकहितवादी मंडळ, नाशिक यांनी या संमेलनाच्या आयोजनासाठी निमंत्रण दिले आहे. गेल्या वर्षभरापासून आपण कोविडचा लढा लढत असून, परिस्थितीत झपाट्याने सुधारणा होत आहे. या पार्श्वभूमीवर हे साहित्य संमेलन आरोग्याची पुरेपूर काळजी घेऊन पार पाडले जाईल तसेच या संमेलनामुळे मराठी साहित्य विश्वात परत एकदा उत्साहाचे  वातावरण निर्माण होईल, अशी आशाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. या संमेलनाच्या आयोजनाला शुभेच्छाही त्यांनी दिल्या. डॉ. जयंत नारळीकर यांच्यासारखा महान खगोलशास्त्रज्ञ आणि ज्येष्ठ साहित्यिक या संमेलनाच्या अध्यक्षपदी  लाभल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी  आनंद व्यक्त केला.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिकUddhav Thackerayउद्धव ठाकरे