शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सरकारी आकडेवारीत कुपोषणाची सत्यता लपविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 01:33 IST

सरकारी यंत्रणांकडून आदिवासींच्या कुपोषणाचे सर्वेक्षण करताना सरकारी आकडेवारीतील सत्यता लपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप करतानाच मेळघाटात महान संस्थेच्या माध्यमातून अनेक सहकाऱ्यांनी एकत्रित काम करीत शासकीय यंत्रणांना जमले नाही ते काम केल्याचे प्रतिपादन डॉ. आशिष सातव यांनी केले आहे.

ठळक मुद्देआशिष सातव : वसंत पवार स्मृती पुरस्काराने सातव दाम्पत्याचा सन्मान

नाशिक : सरकारी यंत्रणांकडून आदिवासींच्या कुपोषणाचे सर्वेक्षण करताना सरकारी आकडेवारीतील सत्यता लपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप करतानाच मेळघाटात महान संस्थेच्या माध्यमातून अनेक सहकाऱ्यांनी एकत्रित काम करीत शासकीय यंत्रणांना जमले नाही ते काम केल्याचे प्रतिपादन डॉ. आशिष सातव यांनी केले आहे.नीलवसंत मेडिकल फाउंडेशन अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरतर्फे गुरुवारी (दि.११) योगदान सोहळ्यात माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या हस्ते डॉ. आशिष सातव आणि डॉ. कविता सातव दाम्पत्याचा ‘डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार २०१८’ प्रदान करून सन्मान करण्यात आला यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी माजीमंत्री विनायकदादा पाटील यांच्यासह के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, सरचिटणीस नीलिमा पवार, सचिव डॉ. सुनील ढिकले, शशिकांत जाधव, वसंत खैरनार आदी उपस्थित होते.डॉ. आशिष सातव म्हणाले, आदिवासींसाठी प्रामाणिकपणे काम करताना अ‍ॅट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल करण्याचे काम काही राजकीय व शासकीय यंत्रणेतील व्यक्तींनी केले. एकीकडे आपण चंद्रावर जात असताना दुसरीक डे आदिवासींचे कुपोषण देशातील वास्तविकतेचे दर्शन घडवित असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. कोट्यवधी रुपये खर्चूनही भारतात कुपोषण निर्मूलन होत नाही. त्यामुळे महान संस्थेच्या माध्यमातून मेळघाटातील उपोषण आणि त्याची वास्तविकता प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मांडल्याने २००५ मध्ये राजमाता जिजाऊ मशीनच्या माध्यमातून आदिवासींचे कुपोषण सर्वेक्षण होऊन सर्व आदिवासी भाग कुपोषित जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. अविनाश अहेर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रमेश मंत्री यांनी केले. डॉ. प्राची पवार यांनी आभार मानले.रुग्णच आमचे देवस्थानमेळघाटातील वैद्यकीय सेवेच्या प्रवासाविषयी सांगताना महात्मा गांधीजी व विनोबा भावे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन जनसेवेचा मार्ग स्वीकारल्याचे सांगतानाच आता रुग्ण हेच देवस्थान आणि रुग्णसेवा पूजा बनल्याचे डॉ. आशिष सातव म्हणाले. तर आदिवासींच्या जीवन अज्ञान, अंधश्रद्धेने व्यापून टाकलेले असल्याने तेथे रुग्णसेवा करणे आव्हानात्मक होते; परंतु जसजसे उपचार सुरू केले तसतसे त्यांच्याशी आत्मियतेचे नाते निर्माण झाल्याचे डॉ. कविता सातव यांनी सांगितले.प्रत्येकाने स्वत:ची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडणे गरजेचे आहे. सैनिकांप्रमाणेच त्यांना लढण्यासाठी बळ देणाºया घटकाचा गौरव होणे आवश्यक असते. योगदान सोहळ्यातून डॉ. सातव दाम्पत्याच्या माध्यमातून मेळघाटात महान संस्थेच्या रुग्णसेवेत योगदान देणाºयांचाही सन्मान असल्याचे माजी मंत्री विनायकदादा पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिकdoctorडॉक्टर