शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शासन उदासीन : जीएसटीमुळे आठ महिन्यांपासून वाऱ्यावर राज्यातील करमणूक कर कर्मचाºयांना नियुक्तीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:28 IST

नाशिक : देशात जुलै महिन्यापासून एकच करप्रणाली लागू केल्याने महसूल खात्यामार्फत गोळा करण्यात येणाºया करमणूक कराची वसुली आता स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सोपविण्यात आल्याने राज्यात महसूल खात्यात करमणूक कर विभागात काम करणारे ४१५ कर्मचारी, अधिकारी गेल्या आठ महिन्यांपासून नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्देकराची वसुली करण्यासाठी स्वतंत्र कक्ष कार्यरतदरमहा करमणूक कराची वसुली केली जात होती

नाशिक : देशात जुलै महिन्यापासून एकच करप्रणाली लागू केल्याने महसूल खात्यामार्फत गोळा करण्यात येणाºया करमणूक कराची वसुली आता स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सोपविण्यात आल्याने राज्यात महसूल खात्यात करमणूक कर विभागात काम करणारे ४१५ कर्मचारी, अधिकारी गेल्या आठ महिन्यांपासून नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून महसूल विभागाकडून करमणूक कराची वसुली करण्यासाठी स्वतंत्र कक्ष कार्यरत होता. या कक्षासाठी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, लिपिकांची नेमणूक करण्यात आली होती. चित्रपट गृह, व्हिडीओ हॉल, दूरदर्शनवरून कार्यक्रम प्रसारित करणारे केबलचालक, डीटीएचधारक यांच्याकडून दरमहा करमणूक कराची वसुली केली जात होती. महसूल विभागाला दरवर्षी लाखो रुपये करमणूक करापोटी रक्कम मिळत होती. परंतु केंद्र सरकारने जुलै महिन्यापासून एक देश एक करप्रणाली जीएसटी लागू केल्यामुळे महसूल विभागाकडून करमणूक कर वसुलीचे काम काढून घेत ते आता स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सोपविण्यात आले आहे.नाशिक शहरात महापालिका, नगरपालिका हद्दीत मुख्याधिकारी, ग्रामीण पातळीवर ग्रामपंचायत यापुढे करमणूक कराची वसुली करणार असल्याने जुलै महिन्यापासून करमणूक कर विभागात काम करणारे राज्यातील ४१५ अधिकारी, कर्मचारी कामाविना कार्यरत आहेत. प्रारंभी या कर्मचाºयांना महसूल विभागात अन्य ठिकाणी सामावून घेण्याचे व विशेष करून गौणखनिज विभागात समाविष्ट करून घेण्याचे ठरविण्यात आले, परंतु त्याबाबत अद्याप शासनचे आदेश निघालेले नाहीत. या कर्मचाºयांना वेळोवेळी करमणूक कर विभागातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली, परंतु आता फेब्रुवारी महिन्यापासून नवीन मुदतवाढही देण्यात आलेली नसल्यामुळे करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.