शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शासन निर्णय : भाजपासह सर्वच पक्षांतील वयोवृद्धांना फटका ज्येष्ठांची शिक्काधिकारी होण्याचीही हुकली संधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 01:22 IST

भाजपात मोदी पर्वाची सुरुवात झाल्यानंतर त्या पक्षातील अनेकांना मखरात बसविण्यात आले. परंतु राज्यातही पक्षातील अनेक ज्येष्ठ सदस्यांना अशाच प्रकारे साधे एसीएमही न बनविता बाजूला ठेवण्याची पुरेपूर व्यवस्था शासननिर्णयामुळे करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे एसीएम म्हणजेच विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून संधी राजकीय कार्यकर्त्यांची शिफारस करण्यात आलीस्व-साक्षांकनाचा अधिकार दिल्याने पदाचे मोल घटले

नाशिक : भाजपात मोदी पर्वाची सुरुवात झाल्यानंतर त्या पक्षातील अनेकांना मखरात बसविण्यात आले. परंतु राज्यातही पक्षातील अनेक ज्येष्ठ सदस्यांना अशाच प्रकारे साधे एसीएमही न बनविता बाजूला ठेवण्याची पुरेपूर व्यवस्था शासननिर्णयामुळे करण्यात आली आहे. अर्थात, त्याचा फटका एकट्या भाजपालाच नव्हे, तर अन्य पक्षातील ज्येष्ठांनाही बसला आहे.पक्षात हयात घालवणारे ज्येष्ठ कार्यकर्ते सर्वच पक्षांत असतात. त्यांना त्यांच्या वयानुरूप विविध पदांवर संधी मिळत असली तरी बहुतांशी पक्षांतील ज्येष्ठांना कालांतराने पक्षातील सक्रिय तसेच सत्तापदांवर संधी मिळत नाही. अशा वेळी किमान एसीएम म्हणजेच विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून संधी दिली जाते. तीही सोपी नसतेच. यंदाच्या भाजपा सरकारच्या कालावधीत ही संधीही हुकली आहे. राज्य सरकारने यासंदर्भात ३१ डिसेंबर २०१५ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार वय वर्षे ६५ पेक्षा अधिक असेल अशांना एसीएमही होता येणार नाही, असे त्यात नमूद आहे. नाशिक जिल्ह्यातून विशेष कार्य अधिकारी पदासाठी ज्या राजकीय कार्यकर्त्यांची शिफारस करण्यात आली होती, त्यातील शंभर ते सव्वाशे ज्येष्ठ कार्यकर्त्यांची नावे अपात्र म्हणून परत आली आहेत. त्यात भाजपाच नव्हे, तर अन्य पक्षांतील ज्येष्ठांचादेखील समावेश आहे. खरे तर एसीएम म्हणजे विशेष कार्य अधिकारी पदाचे आता फार महत्त्व नाही. नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची अशा पदांवर सहज वर्णी लागते आणि साक्षांकनाचे अधिकार प्राप्त होतात. महाविद्यालयीन प्रवेशाच्या वेळी या अधिकाराचा वापर करण्याची संधी उपलब्ध होत असल्याने राजकीय पक्ष महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावर साक्षांकन मोहिमा राबवतात. परंतु सरकारनेच आता सेल्फ अ‍ॅटेस्टेशन म्हणजेच स्व-साक्षांकनाचा अधिकार दिल्याने या पदाचे मुळातच मोल घटले आहे. परंतु असे पद मिळवून नामधारी म्हणून का होईना शिक्काधिकारी होण्याची ज्येष्ठांची संधीही भाजपाने हिरावून घेतली आहे.