शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शासनाची कर्जमाफी फसवी

By admin | Updated: July 11, 2017 23:27 IST

राजू शेट्टी : किसानमुक्ती यात्रेचे दिंडोरीत स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी : सरकार निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन विसरले असून, राज्यात दिलेली कर्जमाफी ही फसवी आहे. त्यातील अटी कुणालाही मान्य नसून सरकारने दिलेल्या शब्दप्रमाणे सरकट कर्जमाफी दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. किसानमुक्ती यात्रेनिमित्त कर्नाटक, पंजाब, आंध्र प्रदेश आदींसह सुमारे आठ राज्यातील सुमारे दीडशे ते दोनशे शेतकरी आपल्या तीस ते चाळीस वाहनांसह गुजरात राज्यात रवाना झाले.यावेळी दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड येथे आमदार नरहरी झिरवाळ यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी यात्रेचे स्वागत केले. त्यावेळी शेट्टी बोलत होते. ते म्हणाले, शेतकरीवर्गाने केलेला संप हा ऐतिहासिक होता. यशस्वी संपानंतर अपेक्षित असे परिणाम मिळायला हवे असताना तसे काही घडले नाही.यावेळी दत्तात्रय पाटील, गंगाधर निखाडे, संदीप जगताप, डॉ. अनिल सातपुते, हृषिकेश पडोळ, सदानंद शिवले, योगेश गोसावी, भास्कर भगरे, सोमनाथ जाधव, नितीन देशमुख आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते. यावेळी कवी संदीप जगताप त्यांनी संप काळात केलेल्या कवितांबद्दल राजू शेट्टी यांनी अभिनंदन करत दिल्ली जंतरमंतर येथील आंदोलनात सहभागी व्हावे व आपल्या कवितेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडाव्यात, असे सांगितले. यात्रेसमवेत मंदसौरमधील प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांच्या सहा प्रतिमा व अस्थिकलश आहेत. ही यात्रा मध्य प्रदेशातील मंदासौर येथून सुरू होऊन नाशिक जिल्ह्यातून गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणामार्गे दि. १८ जुलै रोजी दिल्ली येथे पोहचणार आहे. योगेंद्र यादव यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली व नाशिक जिल्ह्यातून शेतकरी आंदोलनाची सुरुवात यशस्वी झाली असून, आता सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्णच कराव्या लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.