शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळांचा चेंडू शासनाच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:29 IST

शहरातील खुल्या जागेवरील बेकायदेशीर धार्मिक स्थळांबाबत शासनाकडे पाठविण्यात आलेला महासभेचा प्रस्ताव मंजूर करण्याबाबत आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आमदार आणि महापालिका पदाधिकाऱ्यांना सांगितल्याने हा विषय पुन्हा शासनाच्या कोर्टात टोलावला गेला आहे.

नाशिक : शहरातील खुल्या जागेवरील बेकायदेशीर धार्मिक स्थळांबाबत शासनाकडे पाठविण्यात आलेला महासभेचा प्रस्ताव मंजूर करण्याबाबत आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आमदार आणि महापालिका पदाधिकाऱ्यांना सांगितल्याने हा विषय पुन्हा शासनाच्या कोर्टात टोलावला गेला आहे. त्यावर आता शासन कधी निर्णय घेणार हा प्रश्न निर्माण झाला असून, आता आमदारांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.  शहरातील बेकायदेशीर धार्मिक स्थळांचा प्रश्न सोडविण्यासाठी सोमवारी (दि.१७) आमदार आणि महापालिकेतील गटनेत्यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेतली. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे तसेच महापौर रंजना भानसी तसेच विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, गटनेता विलास शिंदे आणि मनसे गटनेता सलीम शेख आदी उपस्थित होते.२००९ पूर्वीची ५०३ आणि त्यानंतरची ७२ अशी ५७५ धार्मिक स्थळे हटविण्यासाठी महापालिकेने कार्यवाही केल्यानंतर मठ-मंदिर धार्मिक समितीने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार महापालिकेस दिलेल्या निर्देशानुसार आता सर्व धार्मिक स्थळांची यादी तपासून हरकती आणि सूचना मागविण्यात येणार आहेत. मात्र, बहुतांशी धार्मिक स्थळे ही महापालिकेच्या खुल्या जागेवर आहेत. नगररचना विभागाच्या नियमानुसार खुल्या जागेत दहा टक्के बांधकाम अनुज्ञेय नसल्याने त्याअंतर्गत ही बांधकामे नियमित करण्यासंदर्भात राज्य शासनाकडे महासभेने प्रस्ताव पाठविला आहे. शासनाकडून हा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून घेणे हा एकमेव पर्याय असल्याचे चर्चेत आल्याने त्यावर काही ठोस निष्पन्न झाले नाही. तथापि, प्रशासनाच्या वतीने हरकती आणि सूचना मागविण्याची कार्यवाही होत असताना या कालावधीत पाठपुरावा झाल्यास ८० ते ८५ टक्के मंदिरे वाचू शकतील, असे यावेळी काही लोकप्रतिनिधींनी सूचित केले.महापालिकेने धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करण्यात अनेक त्रुटी ठेवल्या आहेत. विशेषत: सदरचे धार्मिक स्थळ हे वाहतुकीला अडथळा ठरते आहे किंवा काय, यापूर्वी सामाजिक तणाव निर्माण झाला होता काय असे अहवाल पोलिसांकडून घेणे आवश्यक असतानादेखील महापालिकेने तसे केलेले नाही, असे यावेळी बोरस्ते यांनी सांगितले.अभ्यासाअंती निर्णय घेणारशहरात सध्या हजारो रुपयांच्या घरपट्टीच्या नोटिसा बजावल्या जात आहेत. तसेच खुल्या जागांवरील जाचक करदेखील कायम आहेत. यासंदर्भात आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याशी भाजपा आमदारांनी चर्चा केली. त्याबाबत आयुक्त सकारात्मक असून अभ्यासाअंती निर्णय घेतील, असे आमदार बाळासाहेब सानप यांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाReligious Placesधार्मिक स्थळे