शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी

By admin | Updated: August 7, 2016 23:51 IST

पालकमंत्री : खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी

नाशिक : सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, लासलगाव बाजार समितीच्या प्रकरणाची चौकशी करून गुन्हे मागे घेतले जातील. शासन निर्णयानुसारच लिलावप्रक्रिया राबविणे व्यापाऱ्यांवर बंधनकारक असून व्यापारीवर्गाचे आडमुठे धोरण खपवून घेतले जाणार नाही असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.शासकीय विश्रामगृहावर अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीसाठी महाजन आले असता निफाड तालुक्यातील लासलगाव बाजार समितीच्या सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली. अहमदनगरसह इतर जिल्ह्यांच्या धर्तीवर नाशिक जिल्ह्यांमधील बाजार समित्यांमध्ये लिलावप्रक्रिया राबविली जावी या मागणीसाठी लासलगाव बाजार समिती परिसरात शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. यावेळी पोलिसांनी लाठीमार करून आंदोलन मोडून काढळ्याने शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे व तत्काळ सर्व बाजार समित्यांमधील कामकाज सुरळीत करून अहमदनगरच्या धर्तीवर लिलावाची प्रक्रिया राबविणे व्यापाऱ्यांवर बंधनकारक करावे अशी मागणी जमलेल्या शेतकऱ्यांनी महाजन यांच्याकडे केली आहे. यावेळी नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील, बाबासाहेब गुजर, राजाभाऊ दरेकर, रमेश शिंदे, प्रमोद गायकवाड आदिंसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बाजार समिती प्रशासनाकडून पाठराखणलासलगाव बाजार समितीमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व शेतकरी वेठीस धरल्यानंतर कोणीही व्यापारी, समितीचे पदाधिकारी चर्चेसाठी आले नाही. त्यानंतर संध्याकाळी शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला, तर प्रवेशद्वार बंद करून घेण्यात आले. व्यापाऱ्यांच्या आडमुठे धोरणाला बाजार समित्यांच्या प्रशासनकडून साथ मिळत असल्याचा आरोपही यावेळी शेतकऱ्यांनी महाजन यांच्याशी बोलताना केला. आडतमुक्तीचा शासनाचा निर्णय व्यापाऱ्यांना मान्य नसल्यामुळे ते लिलावप्रक्रिया खोळंबून शेतकऱ्यांची पिळवणूक करत असल्याने नानासाहेब पाटील यांनी सांगितले.