शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचा प्रशासनावर अंकु श नाही : हर्षवर्धन पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:11 IST

पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्राने अनेक सत्तांतरे अनुभवली आहेत; परंतु सद्यस्थितीत राज्याची कोणत्याही क्षेत्रात प्रगती होत नसताना सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावरही अंकुश नसल्याने राज्य सैरावैरा झाल्याची टीका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

नाशिक : पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्राने अनेक सत्तांतरे अनुभवली आहेत; परंतु सद्यस्थितीत राज्याची कोणत्याही क्षेत्रात प्रगती होत नसताना सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावरही अंकुश नसल्याने राज्य सैरावैरा झाल्याची टीका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.नाशिक जिल्हा जैन सांस्कृतिक कला फाउंडेशन व श्री जैन सेवा कार्य समिती यांच्यातर्फे भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात बुधवारी (दि. २८) उद्घाटन झाले. व्यासपीठावर माजी आमदार जयप्रकाश छाजेड, नगरसेवक हेमलता पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, शांतीलाल दुग्गड, मोहनलाल लोढा, डॉ. विक्रम शाह आदी उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील म्हणाले, सध्याची राजकीय स्थिती पाहता महाराष्ट्रात राजकीय चित्र फारसे आशादायी नाही. स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या सत्ताधाºयांनी विरोधकांचा सन्मान करून देशातील लोकशाही सुदृढ केली. त्यामुळे जगभरात भारतीय लोकशाही सर्वात प्रबळ आहे. परंतु सध्याच्या सत्ताधाºयांनी संसदीय प्रोटोकॉल बुकचे कधी वाचनच केले नसल्याचे दिसते आहे. त्यामुळे सरकारचा प्रशासनावर वचक उरलेला नाही. विरोधी पक्षांना विश्वासात न घेता निर्णय घेत सत्ताधाºयांकडून त्यांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न होतो आहे.  हा राजकीय द्वेष पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय आहे. कदाचित सत्तेचे हे चक्र फिरते असल्याचा सध्याच्या सत्ताधाºयांना विसर पडला असल्याचा टोलाही हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला लगावला. दरम्यान, डॉ. विक्रम शाह यांच्या ‘जिनश्वर पूजा’ या पुस्तकाचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन गौतम सुराणा यांनी केले.काम ठप्प पडल्याने वाढले उंदीरमंत्रालयाची अवस्था अनेक दिवसांपासून बंद पडलेल्या घरासारखी झाली आहे. सरकारचे प्रशासनावर नियंत्रण उरले नसल्याने मंत्रालयात कोणतेही काम होत नसून अनेक दिवस फाईली पडून राहिल्यानेच मंत्रालयात उंदीर वाढल्याची बोचरी टीकाही हर्षवर्धन पाटील यांनी राज्य सरकारवर केली.ाजेड यांची खोचक टीकामाजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनीही राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता व्याख्यानमालेचा विषय ‘महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा’ असा ठेवण्याऐवजी ‘महाराष्ट्राच्या राजकारणाची दुर्दशा’ असा ठेवला असता तर तो अधिक संयुक्तिक ठरला असता, अशी खोचक टीका त्यांनी राज्य सरकारवर केली.

टॅग्स :Nashikनाशिक