शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

११ जागांवर शासनाचा ताबा

By admin | Updated: January 9, 2015 00:15 IST

११ जागांवर शासनाचा ताबा

 

शफीक शेख

मालेगावमालेगाव महापालिकेला शासनातर्फे आरक्षित असलेले ११ भूखंड राज्यशासनाने शहर विकासासाठी दिले असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुरुवारी शासकीय अधिकाऱ्यांच्या ताफ्यात सदर ११ जागांचा ताबा घेण्यात आला. या जागांवर शाळा, मैदान, बेघरांसाठी घरे बांधणे, पार्किंग, स्विमिंग पूल, दुकाने, दवाखाना, बगिचा करण्यासाठी त्यांचा महापालिकेला उपयोग होणार आहे. परिणामी मालेगावच्या सौंदर्यात भर पडणार असून, शहरातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे.सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन या जागांची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केल्यानुसार शहरातील ११ जागा महापालिकेला मिळाल्या असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मनपा नगररचना विभागाने फौजफाट्यासह सदर जागांचा ताबा घेतला. आरक्षण क्रमांक ३१ नुसार सिटी सर्व्हे नं. १०९४ ही कॅम्पातील स्वातंत्र्यसैनिक नगरालगतची ०.४३० हेक्टर गावठाण जागेचा ताबा मनपाला मिळाला. यात प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. आरक्षण क्रमांक ३२ ही कॅम्पातील सिटी सर्व्हे नं. १०९४ स्वातंत्र्यसैनिक नगरालगतची गावठाण जागेचा ताबा मनपाने आज घेतला. त्यावर बेघरांसाठी घरे बांधण्यात येणार आहे. आरक्षण क्रमांक ३३ ही कॅम्पातील सिटी सर्व्हे क्रमांक १०३१ कॅम्पातील जागा खेळाच्या मैदानासाठी तर आरक्षण क्रमांक ३४ सिटी सर्व्हे नं. १५३४ ही जागादेखील खेळाच्या मैदानासाठी महापालिकेला मिळाली असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज ताबा घेण्यात आला. आरक्षण क्रमांक ४३/४४ ही सिटी सर्व्हे नं. १०७७ ही कॅम्पातील जागा पार्किंग तसेच दुकान केंद्रासाठी महापालिकेला मिळाली. आरक्षण क्रमांक ५१ नुसार सिटी सर्व्हे नं. ७२७ ही कॅम्पातील जागा बगिचासाठी महापालिकेला शासनाकडून देण्यात आली. आरक्षण क्रमांक ७४ सिटी सर्व्हे नं. ४८ ही कॅम्पातील जागा स्विमिंग पूल व बागांसाठी मिळाली असून, त्याचा ताबाही मनपाने घेतला.