शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
2
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
3
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
4
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
5
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
6
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
7
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
8
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
9
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
10
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
11
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
12
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
13
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
14
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
15
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
16
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
17
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
18
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
19
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
20
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!

सर्वमान्यता लाभलेला खांदेपालट !

By किरण अग्रवाल | Updated: March 25, 2018 01:54 IST

शिवसेनेची पक्ष-संघटनात्मक भट्टी गेल्या काही दिवसांपासून बिघडलेली होती. खासदारकी आहे, मोर्चे-आंदोलनेही बऱ्यापैकी होत; परंतु पक्षांतर्गत चलबिचल मोठ्या प्रमाणात वाढली होती. अशात उशिराने का होईना, महानगरप्रमुखपदाचा खांदेपालट करीत निष्ठावंतांना चाल दिली गेली. त्यामुळे नवीन नेतृत्वाला जुन्यांचेही पाठबळ लाभलेले दिसून आले. या सर्वसामान्यतेच्या बळावर यापुढील वाटचाल केली गेली तर भाजपाशी दोन हात करण्याच्या शिवसेनेच्या प्रयत्नांतील अंतर्गत अवरोध नक्कीच कमी झालेले दिसून येऊ शकतील.

शिवसेनेची पक्ष-संघटनात्मक भट्टी गेल्या काही दिवसांपासून बिघडलेली होती. खासदारकी आहे, मोर्चे-आंदोलनेही बऱ्यापैकी होत; परंतु पक्षांतर्गत चलबिचल मोठ्या प्रमाणात वाढली होती. अशात उशिराने का होईना, महानगरप्रमुखपदाचा खांदेपालट करीत निष्ठावंतांना चाल दिली गेली. त्यामुळे नवीन नेतृत्वाला जुन्यांचेही पाठबळ लाभलेले दिसून आले. या सर्वसामान्यतेच्या बळावर यापुढील वाटचाल केली गेली तर भाजपाशी दोन हात करण्याच्या शिवसेनेच्या प्रयत्नांतील अंतर्गत अवरोध नक्कीच कमी झालेले दिसून येऊ शकतील. लढाईला निघण्यापूर्वी शस्त्रे परजून घ्यावी लागतात, त्याप्रमाणे भाजपाशी दोन हात करीत आगामी निवडणुकांचे मैदान मारावयास निघालेल्या शिवसेनेने नाशिक महानगरप्रमुखपदाचा खांदेपालट केला आहे. या बदलाद्वारे आक्रमकतेचा उपजत पुरस्कार तर केला गेल्याचे दिसून आलेच, शिवाय निष्ठावानांना ‘अच्छे दिन’ येऊ घातल्याचे संकेतही मिळून गेल्याने पक्षांतर्गत कुरबुरी त्यागून शिवसेना पुन्हा नव्या दमाने व जोमाने उभी राहण्याची अपेक्षा बळावून गेली आहे. होणार होणार म्हणून बहुप्रतीक्षित असलेल्या शिवसेनेतील बदलाला प्रारंभ झाला असून, त्याची सुरुवात नाशिक महानगरप्रमुखपदावरील खांदेपालटाने झाली आहे. इतके दिवस दुर्लक्षिल्या किंवा नजरेआड केल्या गेलेल्या ‘एक व्यक्ती, एक पद’ या आदर्श सूत्रानुसार अजय बोरस्ते यांची उचलबांगडी करत सचिन मराठे व महेश बडवे अशा दोघांना महानगरप्रमुखपदाची जबाबदारी विभागून देण्यात आली आहे. बोरस्ते यांच्याकडे नाशिक महापालिकेतील पक्षाचे गटनेतेपदही असल्याने जास्तीच्या जबाबदारीतून त्यांना आराम देण्यात आल्याचे यासंदर्भात सांगण्यात येत असले तरी, ते तितकेसे खरे नाही. कारण तशा ‘आदर्श’ विचारधारेच्या अंमलबजावणीसाठी इतका विलंब करण्याची गरज नसते. इतका म्हणजे किती, तर दुसºया पक्षात गेलेल्या नेत्याने आयोजिलेल्या मिसळ पार्टीत जाऊन आपले मन तेथे मोकळे करण्याची भूमिका बहुसंख्य नेत्यांनी घेईपर्यंत हा विलंब केला गेला. परंतु, ‘जागो तभी सवेरा’ असे म्हणतात त्याप्रमाणे उशिरा का होईना पक्षप्रमुखांनी नाशकातील पक्षांतर्गत खदखदीची दखल घेतली आणि ती घेताना पुन्हा नवीन प्रयोग न करता पक्षातील अनेकविध चढ-उतार अनुभवलेल्या जुन्या-निष्ठावानांच्या हाती नेतृत्वाचे शिवधनुष्य सोपविले. त्यामुळे यशासोबतच पडझडीच्या काळातही पक्षासी इमान राखून असलेल्या; परंतु स्थानिक नेतृत्वाकडून उपेक्षिल्या जाऊन अडगळीत पडलेल्या सैनिकांसह नेत्यांमधील आशा-अपेक्षा उंचावून जाणे स्वाभाविक ठरले आहे. आक्रमकता हा शिवसेनेचा स्थायिभाव राहिला असला तरी, मध्यंतरी त्या मूळ स्वभावाला मुरड घालत काही प्रयोग केले गेले. प्रत्येकवेळी व प्रत्येकच बाबतीत राडेबाजी करणाºयांचा पक्ष अशी जी प्रतिमा तयार झाली होती ती सुधारण्यासाठी हे प्रयोग केले गेले खरे; पण त्यात फारसे यश लाभले नाही. स्व. नीलेश चव्हाण यांच्यासारख्या काँग्रेसमधून आलेल्या सम्यक विचारांच्या तरुणाला महानगरप्रमुखपदी नेमण्यापासून या प्रयोगांची सुरुवात झाली होती. पुढे भाजपातून आलेल्या अजय बोरस्ते यांच्याकडे नेतृत्व सोपविण्यापर्यंत तो धागा बाळगला गेला. चेहरा बदलल्याने पक्षाची प्रतिमा बदलण्यास काहीसा उपयोग झालाही; परंतु अलीकडच्या काळात बोरस्ते यांच्या कार्यशैलीमुळे नाराज होणाºयांचे प्रमाणही वाढत गेले आणि कधी नव्हे, ते या पक्षात निष्ठावंत व बाहेरून आलेल्यांची चर्चा ‘सुप्त’ न राहता चव्हाट्यावर येऊन गेली. यात बोरस्ते हे बाहेरून आलेले असले तरी, निष्ठावंतांत मोडणाºया जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांची साथ त्यांना लाभून गेल्याने ‘अजय-विजय’च्या एकीने अनेक जुन्या-जाणत्यांची बेकी घडून आलेली दिसली. गेल्या महानगरपालिका निवडणुकीप्रसंगी तिकीट वाटपातून माजी जिल्हाप्रमुख विनायक पांडे व महानगरप्रमुख बोरस्ते यांच्यातील कथित मारहाण प्रकरणाबरोबरच, सिडकोतील डी. जी. सूर्यवंशी यांना पक्षात पुनर्प्रवेश दिल्यानंतर पक्षाच्या संपर्कप्रमुखांचे पुतळे जाळण्यापर्यंतचे प्रकार घडून आल्याने शिवसेनेतील खदखद उघड होऊन गेली होती. विशेष म्हणजे, नाशिक महापालिका निवडणुकीत तर शिवसेनाच सत्तेत येणार असे निवडणूकपूर्व चित्र असताना भाजपाने टांग मारल्याने हा पक्ष मागे पडला. तेव्हाच स्थानिक नेतृत्वकर्त्यांची गच्छंती अटळ मानली जात होती. तसे झाले नाही म्हणून पक्षांतर्गत नाराजी ‘मिसळ’वरील ‘तर्री’ बनून पुढे आलेली दिसली.  महत्त्वाचे म्हणजे, महानगरप्रमुखपदावरील यंदाचा खांदेपालट शिवसेनेसाठी शुभसंकेत ठरावा. कारण, त्यानिमित्ताने आजी-माजी सारेच एकत्र आलेले दिसले. दत्ता गायकवाड, विनायक पांडे, जयंत दिंडे आदी माजी पदाधिकारी तर यात होतेच, शिवाय सामान्य शिवसैनिकांनीही मोठी गर्दी करीत ढोल-ताशांनी नवीन महानगरप्रमुखांचे स्वागत केले. अशी सर्वमान्यता अपवादानेच नशिबी येते, जी मराठे व बडवे यांना लाभली. यातून प्रदर्शित झालेल्या विश्वासाला जागण्याची व सर्वांना सोबत घेऊन चालण्याची जबाबदारी आता नव्यांची आहे. दुसरे म्हणजे, नवा पदावर आरूढ होताना जुना रुसून बाजूला जातो, हाच आजवरचा कोणत्याही पक्षातील प्रघात राहिल्याचे दिसून येते. परंतु यंदा नवीन पदाधिकाºयांचे पदग्रहण होताना दूर सारले गेलेले बोरस्तेही आवर्जून उपस्थित राहिले व साºया चर्चा, शक्यतांना फेटाळून लावत नवीन नेतृत्वाच्या खांद्यास खांदा लावून पक्षकार्यात सक्रिय राहण्याचे अभिवचन त्यांनी दिले. स्वबळावर आगामी निवडणुकांचे मैदान सर करायला सज्ज झालेल्या शिवसेनेला हे असेच पक्ष-संघटनात्मक एकीचे बळअपेक्षित आहे. या पदग्रहणानंतर सिडकोतील ९९ वर्षे कराराची घरे ‘फ्री होल्ड’ करून संबंधितांच्या नावे करण्याच्या मागणीसाठी काढल्या गेलेल्या मोर्चात लगेच त्याचे प्रत्यंतरही आले. विधानसभेपूर्वी  विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील  निवडणूक होऊ घातल्याने त्यातील उमेदवारीवरून गटबाजी डोके  वर काढू पाहते आहे; परंतु तत्पूर्वी आणखी काही बदल घडवून गटबाजीच मोडीत काढली गेली तर पक्षाला अपेक्षित व त्यातून कार्यकर्त्यांच्याही वाट्यास येऊ शकणाºया ‘अच्छे दिन’कडे  वाटचाल नक्कीच घडून येऊ शकेल, अशी आशा बाळगावयास हरकत नसावी.

टॅग्स :Politicsराजकारण