शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

शुभवर्तमान : मनपा शिक्षण मंडळात नववर्षात संकल्पना राबविण्याची तयारी सहा शाळांमध्ये व्हर्च्यूअल क्लासरूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:54 IST

नाशिक : डिजिटल युगाशी जुळवून घेण्याची सवय आता महापालिका शाळांनाही लागली पाहिजे. त्यासाठीच, नाशिक महापालिकेच्या सहा शाळांमध्ये व्हर्च्यूअल क्लासरूमची संकल्पना राबविण्यात येणार असून, नववर्षात त्याचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली आहे.डिजिटल युगाचा स्वीकार करण्यात महापालिका शाळाही मागे राहू नयेत, यासाठी शिक्षण विभागामार्फत वेगवेगळ्या ...

ठळक मुद्देडिजिटल युगाचा स्वीकार नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले

नाशिक : डिजिटल युगाशी जुळवून घेण्याची सवय आता महापालिका शाळांनाही लागली पाहिजे. त्यासाठीच, नाशिक महापालिकेच्या सहा शाळांमध्ये व्हर्च्यूअल क्लासरूमची संकल्पना राबविण्यात येणार असून, नववर्षात त्याचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली आहे.डिजिटल युगाचा स्वीकार करण्यात महापालिका शाळाही मागे राहू नयेत, यासाठी शिक्षण विभागामार्फत वेगवेगळ्या स्तरावर नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून व्हर्च्यूअल क्लासरूमची संकल्पना महापालिकेच्या शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या खासदार निधीतून मनपा शिक्षण विभागाला ६ व्हर्च्यूअल क्लासरूम मंजूर झाल्या आहेत.या क्लासरूमचे केंद्र मनपाच्या शाळा क्रमांक ६ मध्ये असणार आहे. शिक्षण विभागाने सहाही विभागातील एका शाळेची त्यासाठी निवड केली आहे. शाळा क्रमांक १६ मधून प्रक्षेपण संबंधित शाळांमध्ये केले जाणार आहे. त्यात प्रामुख्याने मान्यवर तज्ज्ञांची व्याख्याने, चर्चासत्र, शैक्षणिक लघुपट, अभ्यासाला पूरक फिल्मस् यांचा समावेश असणार आहे. संबंधित शाळांमध्ये आसपासच्या पालिका शाळांमधील विद्यार्थी निवडून त्यांचे गट करून त्यांना व्हर्च्यूअल क्लासरूमशी कनेक्ट केले जाणार आहेत. ज्या शाळांमध्ये नववी-दहावीचे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठीही उपयुक्त अशा कार्यक्रमांची आखणी करण्याचे काम सुरू असल्याची माहिती उपासनी यांनी दिली. या क्लासरूमच्या माध्यमातून त्या-त्या शाळांमधील शिक्षकांचे उद्बोधन होणार आहे.