शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

गोरेवाडी शाळेला मिळाला ‘टॅब शाळा’ होण्याचा लौकिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 17:54 IST

सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गोरेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला तालुक्यातील पहिल्या ‘टॅब स्कूल’चा लौकिक लाभला आहे. शिक्षक वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त गोरे कुटुंबीयांनी शाळेला टॅब भेट दिले.

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील गोरेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला तालुक्यातील पहिल्या ‘टॅब स्कूल’चा लौकिक लाभला आहे. शिक्षक वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त गोरे कुटुंबीयांनी शाळेला टॅब भेट दिले.आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते टॅबचे वितरण झाले. जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, कोपरगाव पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब राहणे, राज्य शिक्षक संघाचे मार्गदर्शक सोमनाथ तेल्हुरे, शालेय समितीचे अध्यक्ष गुलाब गोरे, सरपंच शिवाजी शिंदे, उपसरपंच शिवनाथ गोरे, भाऊसाहेब शिंदे, अण्णा गोरे, संदीप लेंडे, दिनकर गोरे, मच्छिंद्र गोरे, बाळासाहेब गोरे आदी उपस्थित होते.गोरे कुटुंबीयांच्या दातृत्वातून शाळा डिजिटल बनली आहे. पुढील काळात डिजिटल शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी यावेळी सांगितले. गोरे कुटुंबीयांच्या उपक्रम प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले.शाळेतील मुलांची संख्या अवघी १६ आहे. मात्र नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर व कमी पटसंख्या असल्याने सुविधा पुरवण्याकडे तसा फारसा कल नाही. तथापि, गोरे कुटुंबीयांनी १० टॅब उपलब्ध करून दिल्याने दोन मुलांत एक टॅब सध्या दिला जात आहे. अजून सहा टॅब उपलब्ध करण्याचे प्रयत्न मुख्याध्यापक प्रभाकर गुरकुले, उमेश खेडकर यांनी सुरू ठेवला आहे. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांकडे दोन ते तीन किलो वजनाचे दप्तर होते. टॅब मिळाल्याने हे ओझेही कमी होऊन विद्यार्थी डिजिटल पद्धतीने धडे गिरवणार आहेत. त्यासाठी विविध विषयांचे अ‍ॅपही मिळविले जात आहेत.शिक्षकी पेशा केलेल्या नामदेव केरू गोरे यांनी मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी मोठी धडपड केली. प्रसंगी खिशातून खर्च करून सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या पश्चात हाच वारसा त्यांच्या कुटुबीयांनीही सुरू ठेवला आहे. नामदेव गोरे यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त इतर कोणताही खर्च करण्याऐवजी त्यांची मुले बाळासाहेब, संतोष व राजेंद्र गोरे यांनी शाळेला टॅब प्रदान केले. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रtechnologyतंत्रज्ञान