मालेगाव : येथील गुरु रविदास समता सामाजिक विचार मंच व राष्ट्रीय चर्मकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गोपीनाथ गाडे महाराज यांचा संगीतमय प्रवचनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. सदर कार्यक्रम आयएमए हॉलमध्ये झाला.समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाथरे यांच्या हस्ते गुरु रविदास महाराज व वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहित तेली यांनी केले. गाडे महाराज यांनी प्रवचनातून गुरु रविदास महाराज यांच्या दोह्यांचा अर्थ स्पष्ट करून सांगितला. अंधश्रद्धेपासून लांब राहा, पर्यावरणाचे रक्षण करा, आई-वडिलांनाच देव माना, जनसेवा करा व संतांचे विचार अंगीकारा, असा संदेश गाडे महाराज यांनी दिला. यावेळी रवींद्र अहिरे, रवींंद्र पवार, रजनीकांत मुलजीर, ज्ञानेश्वर मेहंदळे, दिलीप पाथरे, देवीदास सुरंजे, नंदू डावरे, पंकज पवार उपस्थित होते.
गोपीनाथ गाडे महाराजांच्या प्रवचनाने श्रोते मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:49 IST