चांदवड : येथील क्रीडा संकुलाच्या कालिका पटांगणावर चांदवड प्रीमिअर लीग-२ च्या तिसऱ्या दिवशी चांदवड स्टारचा फलंदाज गोपाळ ठाकरेने सहा चेंडूत सहा षटकार ठोकले. सकाळच्या सत्रात प्रथम सामना रंगला तो चांदवड स्टार विरु द्ध ओमसाई इलेव्हनमध्ये. नाणेफेक जिंकून चांदवड स्टारच्या संघाने प्रथम फलंदाजी करत 10 षटकात १२१ धावांचा डोंगर उभारला.या संघाचा खेळाडू गोपाळ ठाकरे याने एकाच षटकात सहा चेंडूवर सहा षटकार मारत एक नवीन विक्रमाला गवसणी घातली आहे. स्पर्धेतील नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील तो एकाच षटकात सहा षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला आहे. प्रत्युत्तरासाठी दाखल झालेल्या ओम साई इलेव्हन संघाने ८ गडी बाद फक्त ५६ धावाच जमवल्या. ६५ धावांनी स्टार संघाने विजय मिळवला. गोपाळ सामनावीर ठरला. दुसºया सामना ब्लू पँथर व पोलीस इलेव्हन संघात रंगला. ब्लू पँथरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ८५ धावांचे लक्ष्य पोलीस संघासमोर ठेवले. परंतु पोलीस संघ अवघे ४० धावाच करू शकला. ४५ धावांनी ब्लू पॅँथरने सामना जिंकला. ब्लू पँथरकडून बनी याने वैयक्ति ३५ धावा केल्या. व ३ फलंदाज बाद केले म्हणून त्यास सामनावीर घोषित केले.
गोपाळ ठाकरेचे सहा चेंडूत सहा षटकार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:39 IST