शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सराईत गुंडांनी ५० हजारांची खंडणीसाठी गुन्हेगारालाच धमकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 01:31 IST

नाशिक : शहरातील पंचवटी भागात पाच वर्षांपूर्वी झालेल्या एका खुनाच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार न्यायालयात सुनावणीसाठी तारखेला हजर राहिले असता एका सराईत गुंडाने दुसऱ्या गुन्हेगाराला न्यायालयाच्या परिसरातच जिवे ठार मारण्याची धमकी देत ५० हजारांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देन्यायालय परिसरात घडला प्रकार : खुनाच्या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी आले असता केला दुसरा गुन्हा

नाशिक : शहरातील पंचवटी भागात पाच वर्षांपूर्वी झालेल्या एका खुनाच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार न्यायालयात सुनावणीसाठी तारखेला हजर राहिले असता एका सराईत गुंडाने दुसऱ्या गुन्हेगाराला न्यायालयाच्या परिसरातच जिवे ठार मारण्याची धमकी देत ५० हजारांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, २०१६साली पंचवटीत एका तरुणाच्या झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात सराईत गुन्हेगार संशयित जयेश हिरामण दिवे व संशयित पवन शिवाजी कातकाडे (३३,रा.इंदिरानगर) हे दोघेही सहआरोपी आहेत. त्यांची यापूर्वी न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. या गुन्ह्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीकरिता दोघेही न्यायालयाच्या आवारात हजर राहिले असता दिवे याने कातकाडे याच्याकडे ५० हजारांची खंडणी मागत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी कातकडे याने दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत संशयित दिवे व त्याचा दुसरा साथीदार संशयित अरुण गायकवाड (४०, रा. कोळीवाडा, हिरावाडी) या दोघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाच्या गुन्ह्यात कातकाडे, दिवे हे सहआरोपी आहेत. बुधवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास न्यायालयात सुनावणीसाठी संशयित आले होते. त्यावेळी पवन हा रोहित उघडेसोबत बसलेला असताना संशयित दिवे व गायकवाड यांनी कातकाडेस जिवे मारण्याची धमकी देत ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. यामुळे कातकाडे सरकारवाडा पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघा संशयितांना अटक केली. न्यायालयाने दोघांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.जयेश दिवेविरुद्ध खुनाचे तीन गुन्हेसंशयित जयेश दिवे याच्याविरोधात यापूर्वी तीन खून, मारहाण, जबरी चोरी, दरोडा, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्ह्यांसह एकूण दहा गुन्हे दाखल आहेत. तसेच संशयित अरुण गायकवाडविरोधात मारहाणीचा गुन्हा याअगोदर दाखल आहे. दिवे हा सराईत गुन्हेगार असून, पोलिसांनी त्याच्यासह टोळीविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईदेखील केली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी