शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

रासाकाचं चांगभलं, निसाकाचं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 01:44 IST

ओझर : उमेदीच्या काळात निवृत्ती भोगत असलेला रानवड सहकारी साखर कारखाना आता प्रकाशझोतात आलेला असतानाच निसाकाच्याही चिमणीतून धूर निघण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. निसाका सुरू करण्याबाबत सहकार क्षेत्रातील धुरिणांची कसोटी लागणार आहे.

ठळक मुद्देअपेक्षा उंचावल्या : सहकार क्षेत्रातील धुरिणांची कसोटी

सुदर्शन सारडाओझर : उमेदीच्या काळात निवृत्ती भोगत असलेला रानवड सहकारी साखर कारखाना आता प्रकाशझोतात आलेला असतानाच निसाकाच्याही चिमणीतून धूर निघण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. निसाका सुरू करण्याबाबत सहकार क्षेत्रातील धुरिणांची कसोटी लागणार आहे.राज्याच्या सहकारी साखर कारखानदारीत एकेकाळी निफाडचा असलेला दबदबा गेल्या दोन दशकांपासून नामशेष झाला आहे. ज्या साखर कारखान्यांच्या माध्यमातून तालुक्यातील नेत्यांनी मुंबईपासून दिल्लीपर्यंत आपली वेगळी छाप उमटवली, तेच कारखाने आर्थिक संकटात सापडले असून, चुकीच्या धोरणांमुळे बंद पडले आहेत. त्यामुळे सत्ताधारी गटांचे साखर कारखानदारीमधील वलय नाहीसे झाले. निसाका-रासाकाच्या चिमण्या गंजून गेल्या असताना, त्या बॉयलरमधून धूर कसा काढता येईल यासाठी गेल्या दीड दशकात अथक प्रयत्न झाले. रासाका दोनवेळेला बाहेरच्यांनी येऊन उत्पन्न घेत एक्झिट घेतली. निवडणूक प्रचाराच्या दरम्यान अजित पवार यांनी रासाका सुरू करण्याबाबतचा शब्द दिला आणि जिल्ह्यात कादवानंतर सहकार तत्वावर दुसऱ्या कारखान्याची चाके आता फिरणार आहेत.निफाडमधील सिंचन क्षेत्र जवळपास साठ हजार हेक्टर आहे. येथील ऊस लागवडीवर आजूबाजूचे कारखाने पोट भरत असताना रासाकाची उत्पादन क्षमता वाढवून सर्वच अर्थाने येथील उद्योजकता कशी उजळून निघेल, यादृष्टीने आता बनकर पतसंस्थेला प्रयत्न करावे लागणार आहेत. निसाका हा रासाकापेक्षा अनेकपटींनी मोठा कारखाना असला तरी आर्थिक संकटात त्याचा जीव गुदमरून गेला आहे. आता रासाकाबरोबरच त्याचीही फाईल वरच्या स्तरावरून हलल्यास निफाडच्या सहकार क्षेत्राला पुनर्वैभव प्राप्त होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.टीम रासाका नेमण्याचे आव्हान रासाका कार्यस्थळावर काकासाहेब वाघ यांना अभिवादन करण्यासाठी नेते एकत्र आले, त्यातील शेजारी बसलेले अनेक नेते निसाकाचे सत्ताधीश राहिलेले आहेत. त्यामुळे पतसंस्थेचे सर्वेसर्वा आमदार दिलीप बनकर यांना टीम रासाका नेमताना इतिहासदेखील चाळावा लागणार आहे. पहिली दोन वर्षे ताक फुंकूनच प्यावे लागणार असल्याचे दिसते. रासाकाबरोबरच आर्थिक गाळात रूतलेल्या निसाकाची चाके फिरवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकार