शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या स्मृतींनी जीवनात आनंद फुलतो : ब्रह्मकुमार रूपेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:44 IST

जीवनात आलेल्या आनंदी क्षणाच्या स्मृती वेळोवेळी ताज्या करत राहिल्याने जीवनात आनंद कायम टिकून राहतो. मनुष्य नैराश्याच्या गर्तेत बुडत नाही. ताणतणावापासून सुटका करून घेण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.

नाशिक : जीवनात आलेल्या आनंदी क्षणाच्या स्मृती वेळोवेळी ताज्या करत राहिल्याने जीवनात आनंद कायम टिकून राहतो. मनुष्य नैराश्याच्या गर्तेत बुडत नाही. ताणतणावापासून सुटका करून घेण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. चांगल्या स्मृती नेहमीच आनंद देतात, असे प्रतिपादन ब्रह्मकुमार रूपेश यांनी केले.गोदाकाठावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे २९वे पुष्प नाशिक वसंत व्याख्यानमालेत अर्जुनसिंग बग्गा स्मृती व्याख्यानात ‘खुशनुमा जिंदगी’ या विषयावर रूपेश बोलत होते. यावेळी ते म्हणाले, जीवनात दु:ख, कटू प्रसंग यावे, असे कोणालाही वाटत नाही; मात्र जीवनाचा तोदेखील एक भाग आहे. त्यामुळे आलेल्य कटू प्रसंगांना तसेच दु:खदायक घटनांना मानवाला वेळोवेळी सामोरे जावे लागतेच. मात्र त्या घटना मानवाने विसरणे गरजेचे असते, परंतु मनुष्याचे नेमके याविरुद्ध घडते. तो जीवनात घडणाऱ्या आनंदी बाबी, प्रसंग विसरून जातो आणि दु:खदायक वेदनादायी प्रसंगांना कवटाळून बसतो. त्यामुळे त्याचे जीवन निराशावादी बनत जाते. त्यानंतर ब्रह्मकुमारी गीतादीदी यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना सांगितले, भारतात जन्म घेणारे पुण्यात्मा आहेत. भारतभूमी अतुलनीय आहे. आपण आपल्या इच्छा, आकांक्षा नियंत्रणात ठेवल्या तर जीवनात अधिकाधिक आनंद प्राप्त होतो. कमाई करण्यासाठी गुंतवणूक करण्याची गरज आहे. दानशूर वृत्तीचा विकास कसा होईल, यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. जो जसा वागतो, तसेच त्याला फळ जीवनात मिळत असते, हे विसरून चालणार नाही. क्षमा हे माणसाचे सर्वात मोठे शस्त्र आहे. माणसाने क्षमाशील होण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक