१५ मेपर्यंत पोलीस कोठडी : घटनेला एक वर्ष पाच दिवसांचा कालावधीनाशिक : गुन्हेगार मोहन चांगले आणि दीपक सोनवणे या दुहेरी हत्त्या प्रकरणाला एक वर्ष पाच दिवस उलटल्यानंतर यातील पाचवा फ रार संशयित राकेश कोष्टी सोमवारी न्यायालयात शरण आला़ त्यास न्यायाधीश एम़ जे़ डौले यांच्यासमोर हजर केले असता १५ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली़ गत वर्षभरापासून संशयित कोष्टी फ रार होता़७ मे २०१३ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास सराईत गुन्हेगार मोहन चांगले आणि दीपक सोनवणे हे दोघे गंगापूररोडवरील नवश्या गणपतीजवळील हॉटेल विसावा येथे जेवणासाठी गेलेे असता त्यांचा तीक्ष्ण हत्त्याराने खून केल्याची घटना घडली होती़ या प्रकरणी राजेंद्र वाघ, व्यंकटेश मोरे, अर्जुन पगारे, गिरीश शेी, राकेश कोष्टी या पाच संशयितांवर रामदास चांगलेच्या फि र्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़या दुहेरी हत्त्येनंतर पोलिसांनी चारही संशयितांना अटक केली, यातील एक संशयित जामिनावर असून, उर्वरित तिघे न्यायालयीन कोठडीत आहेत़ मात्र पाचवा संशयित राकेश कोष्टी वर्षभरापासून फ रार होता़ सोमवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तो जिल्हा व सत्र न्यायाधीश शिरसाळे यांच्या न्यायालयात शरण आला़ त्यांनी त्यास गंगापूर पोलिसांच्या स्वाधीन होण्याचे आदेश दिले़ दरम्यान, गंगापूर पोलिसांनी न्यायाधीश डौले यांच्या न्यायालयात हजर केले असता १५ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली़ (प्रतिनिधी)
चांगले हत्त्येतील फ रार कोष्टी न्यायालयास शरण
By admin | Updated: May 12, 2014 23:20 IST