शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या काळात संबळ वाजंत्रीला ‘अच्छे दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:18 IST

जळगाव निंबायती :  (अमोल अहिरे )जगभरात आलेल्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरात तब्बल अडीच महिन्यांहून अधिक काळ ताळेबंद लागल्याने जवळपास सर्वच व्यवसायांवर याचा परिणाम झाला.

जळगाव निंबायती :  (अमोल अहिरे )जगभरात आलेल्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरात तब्बल अडीच महिन्यांहून अधिक काळ ताळेबंद लागल्याने जवळपास सर्वच व्यवसायांवर याचा परिणाम झाला.लग्नसराईलादेखील कोरोनाचा फटका बसला. छोटेखानी लग्न समारंभ करण्याचे शासनाचे आदेश असल्याने ऐन लग्नसराईच्या हंगामात लॉन्स, मंगल कार्यालय संचालक, वाजंत्री, घोडेवाले, आचारी, वाढपी, पुरोहित आदी यासंबंधी व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. मात्र सध्या होत असलेल्या छोटेखानी लग्नसोहळ्यासाठी कमी खर्चीक पारंपरिक संबळ वाजंत्रीला लोकांची विशेष पसंती मिळत आहे. यामुळे संबळ वादकांना सध्या तरी ‘अच्छे दिन’ आले आहेत. अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात प्रशासनाने जाहीर केलेल्या नवीन नियमावलीप्रमाणे लग्न सोहळ्यासाठी दोन्ही बाजूंकडील जेमतेम पन्नास सगेसोयरे वºहाडी मंडळींना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. शिवाय शारीरिक अंतराचा नियम पाळून आणि उपस्थितांनी चेहऱ्यावर मास्क लावून अतिशय साध्या पद्धतीने लग्न सोहळ्याचा प्रवास सध्या सुरू झालेला आहे. अशा पार्श्वभूमीवर लग्नात वरातीसाठी केवळ चार वादकांचे पथक असलेल्या पारंपरिक संबळ वाजंत्रीला सुगीचे दिवस आले आहेत. या वाजंत्री व्यवसायावर पोटापाण्यासाठी अवलंबून असणाºया वादकांना नाइलाजाने अन्य व्यवसाय, शेती, मजुरी किंवा अगदी मिळेल ते काम करण्याची वेळ आली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छोटेखानी लग्नसोहळ्यासाठी केवळ चार वादक असलेल्या संबळ वाजंत्रीला लोकांची मागणी वाढत आहे.--------------------काही वर्षापूर्वी लग्नसोहळा म्हटले की सनई-चौघडे, संबळ वाजंत्री या पारंपारिक साधनांनाच विशेष पसंती मिळत असे. लग्न म्हटले की, वाजंत्रीशिवाय शोभा नाही, असा काहीसा समज आहे.लग्नसराईच्या काळातील केलेली कमाई या वादकांना वर्षभर पुरत असे. मात्र गेल्या काही वर्षांपासून लग्नाचा थाट बदलला. लग्नात वºहाडी मंडळींची संख्या लक्षणीय वाढू लागली.लग्नाच्या वरातीसाठी आलेल्या आधुनिक बॅण्ड, बेंजो, डीजेच्या दणदणाटात ही पारंपरिक वाद्य आणि वाजंत्री प्रकार काळाच्या ओघात लोप पावल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती.--------------------संबळ वाजंत्रीचा आमचा पारंपरिक व्यवसाय असून, गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून उदरनिर्वाहासाठी आमचा परिवार या व्यवसायात आहे. संबळवादक, सूर व दोन पिपाणीवादक असे चार वादकांचे पथक असून, एका लग्नाची सुपारी सहा ते सात हजार रुपये असते. बॅण्ड व डिजेच्या तुलनेत संबळ कमी खर्चीक वाजंत्री आहे. यामुळे लोकांची मागणी वाढत आहे. या कलेची जोपासना होण्याच्या उद्देशाने आम्ही आमच्या मुलांनादेखील ही वाद्ये शिकविण्याचा प्रयत्न करीत आहोत.- दिनकर अहिरेसंबळवादक, चोंडी जळगाव

टॅग्स :Nashikनाशिक