शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

येवला तालुक्यात दुग्ध व्यवसायाला अच्छे दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 11:17 PM

दत्ता महाले । येवला : पिवळं सोनं काळवंडलं आणि कांद्याच्या वजनासह दरात घट होत असली तरी, दुभती जनावरे शेतकऱ्याला ...

ठळक मुद्देशुभवार्ता : गायीच्या दुधाला ३० ते ३५ रुपयांचा दर

दत्ता महाले ।येवला : पिवळं सोनं काळवंडलं आणि कांद्याच्या वजनासह दरात घट होत असली तरी, दुभती जनावरे शेतकऱ्याला मोठा आधार ठरत असल्याचे चित्र येवला तालुक्यात दिसून येत आहे. धवल क्र ांतीला सुगीचे दिवस असून, गायीच्या दुधाला ३० ते ३५ रुपयांचा दर मिळत असल्याने दूध उत्पादक खुश आहेत, त्यामुळे शेतात कमी पिकलं तरी किमान दोन पैसे तरी दुधाच्या रूपाने शेतकºयाला मिळत आहेत.दुधाळ जनावरांचे दर मात्र गगनाला भिडले आहेत. चांगल्या प्रतीच्या संकरित गायीची ५० ते ८० हजार रुपयांपर्यंत खरेदी-विक्री होत आहे. येवला येथील मंगळवारच्या आठवडे बाजारात संकरित गायी खरेदी करण्याऐवजी थेट शेत शिवारात जाऊन गाय किती दूध देते यावर तिचा दर ठरवण्याला शेतकरी अधिक पसंती देत असल्याचे चित्र दिसत आहे. ढेपीसह हिरवा चारा असेल तर जनावरे दुधाला चांगलीच उतरतात. सध्या ढेपीचे दर शेतकऱ्यांच्या आवाक्यात आहेत. सरकी ढेप सध्या २२०० रु पये प्रतिक्विंटल मिळत आहे.यंदा पाऊस चांगला असल्याने विहीर पाणी पातळी टिकून आहे. जनावरांना हिरवा चारा मोठ्या शेतकºयाला आपल्याच शेतात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असल्याने दूध उत्पादन चांगले होत आहे. यात निरंतर वाढ होत असून, तुलनात्मक खर्च कमी होत असल्याने दुधाचा व्यवसाय सध्या परवडत असल्याचे दुग्ध उत्पादक सांगतात.येवला तालुक्यात अनेक ठिकाणी छोटे-मोठे चिलिंग प्लॅन्ट झाल्याने दूध नजीकच्या केंद्रावर पोहोचविणे शेतकºयांना सहज शक्य होत आहे. शहरी भागात देशी गायीच्या दुधाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे गीर गायी शहर परिसरात आता दिसू लागल्या आहेत.देशी गायीच्या दुधाला पसंतीगीर अर्थात देशी गायीच्या दुधाला हवी ती किंमत द्यायला शहरी ग्राहक तयार आहेत, पण या दुधाचा तुटवडा असतो. या दुधाला ५० ते ६० रु पये प्रतिलिटर दर द्यायला तयार आहे. आता प्रत्येक वाडी-वस्तीवर दुभती जनावरे दिसू लागली असून, शेतकरी दुग्ध व्यवसायाला मोठी पसंती देऊ लागले आहेत.शेतीला पूरक व्यवसाय असेल तरच शेती परवडते. हिरवा चारा घरीच असतो. ढेप आणली की चार दुभत्या गायी सांभाळणं सोपं असतं. त्यातून दोन पैसे मिळतात. प्रपंच चांगला चालतो.- पंकज खोकले, दूध उत्पादक, आडगाव चौथा

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रmilkदूध