शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

गोंदे फाट्यानजीक राष्ट्रीय महामार्गाची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 00:32 IST

नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे फाटा परिसरातील समांतर रस्ता खचल्याने या ठिकाणी अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यातच महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनधारकांना मार्गक्रमण करताना कसरत करावी लागत असून, रस्त्यावर पथदीप नसल्याने रात्रीच्या वेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

ठळक मुद्देनांदूरवैद्य : रस्त्यावर खड्डेच खड्डे; समांतर रस्त्यांवरील पथदीप बंद

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे फाटा परिसरातील समांतर रस्ता खचल्याने या ठिकाणी अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यातच महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनधारकांना मार्गक्रमण करताना कसरत करावी लागत असून, रस्त्यावर पथदीप नसल्याने रात्रीच्या वेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.संबंधित विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी सरपंच शरद सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य परशुराम नाठे आदींसह ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग प्रमुख अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या रस्त्याची धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे येथील वाहनधारक धास्तावले आहेत. सदर रस्ता राष्ट्रीय महामार्गावरील औद्योगिक वसाहतीत असल्यामुळे या परिसरात रात्री-अपरात्री कामगारांची नेहमीच वर्दळ असते. यामुळेच या रस्त्याला पथदीप नसल्यामुळे अपघाताचा सामना करावा लागतो. रस्त्याची दुरुस्ती करण्यात येऊन या रस्त्याला पथदीप बसविण्यात यावेत, अशी मागणी सरपंच शरद सोनवणे केली आहे.नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे फाटा येथे जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असल्याने या महामार्गाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन हा नाशिकहून मुंबईकडे जातो, त्यामुळे दररोज येथून हजारो वाहनांची मालवाहतूक होत असते; मात्र पावसाळ्यात या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे झाल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकroad safetyरस्ते सुरक्षा