नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील वेदांत जाधव याने मलेशिया येथे पार पडलेल्या स्पार्टन रेस स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून अवघ्या चौदाव्या वर्षी कांस्यपदकाला गवसणी घातली आहे. तिरंगा मलेशियात फडकावत देशासह आपल्या गावाचे नाव मोठ्या अभिमानाने झळकवून नाशिक जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.दि. २० जुलै रोजी मलेशियात स्पार्टन रेस या क्रीडा प्रकारात त्याने भारताचे नेतृत्व केले आहे. २० प्रकारचे अडथळे पार करताना पाच किलोमीटर अंतरात उंच डोंगर पार करणे, उंच भिंत, दोर चढणे, तारेखालून फरफटणे, नदी पार करणे, ३० किलो वजनासह ३०० मीटर धावणे, असा खडतर अडथळा पार करीत नेत्रदीपक कामगिरी करीत विजयश्री खेचून आणली. वेदांत हा नाशिक येथील विज्ङम हायस्कूल, गंगापूररोड या शाळेत शिकत आहे. त्यास क्रीडाशिक्षक चैतन्य भोसले यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल गोंदेदुमालाचे सरपंच शरद सोनवणे, माजी सरपंच गणपत जाधव, प्रसिद्ध शिवव्याख्याते विनोद नाठे आदींसह ग्रामस्थांनी वेदांतचे कौतुक केलेआहे.
गोंदे दुमालाच्या युवकाने फडकावला तिरंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:37 IST
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील वेदांत जाधव याने मलेशिया येथे पार पडलेल्या स्पार्टन रेस स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून अवघ्या चौदाव्या वर्षी कांस्यपदकाला गवसणी घातली आहे. तिरंगा मलेशियात फडकावत देशासह आपल्या गावाचे नाव मोठ्या अभिमानाने झळकवून नाशिक जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
गोंदे दुमालाच्या युवकाने फडकावला तिरंगा
ठळक मुद्देमलेशियात मानाचा तुरा : स्पार्टन रेस स्पर्धेत कांस्यपदकाला गवसणी