शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पत्रिका वाटप टाळून केला  लग्नाचा सुवर्ण महोत्सव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:17 IST

लग्नसोहळा किंवा कोणत्याही कार्यक्रमाच्या पत्रिका वाटप करणे तसेच धावपळ पर्यावरणच्या दृष्टीने सोयीचे नाही. ‘लोकमत’ने त्या पार्श्वभूमीवर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिकमधील ज्येष्ठ नागरिक अशोक रामचंद्र देशमुख यांचा लग्नाचा सुवर्ण महोत्सव व मधुकर लक्ष्मण बर्वे यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याची निमंत्रण पत्रिका न वाटता आप्तस्वकीयांना सोशल मीडियावरूनच कळविण्यात आले तसेच पत्रिका वाटप टाळा असे आवाहन करण्यात आले.

नाशिक : लग्नसोहळा किंवा कोणत्याही कार्यक्रमाच्या पत्रिका वाटप करणे तसेच धावपळ पर्यावरणच्या दृष्टीने सोयीचे नाही. ‘लोकमत’ने त्या पार्श्वभूमीवर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिकमधील ज्येष्ठ नागरिक अशोक रामचंद्र देशमुख यांचा लग्नाचा सुवर्ण महोत्सव व मधुकर लक्ष्मण बर्वे यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याची निमंत्रण पत्रिका न वाटता आप्तस्वकीयांना सोशल मीडियावरूनच कळविण्यात आले तसेच पत्रिका वाटप टाळा  असे आवाहन करण्यात आले.  आणि त्यानुसार सोहळाही पार  पडला.  लग्नपत्रिका वाटताना अनेकदा अपघात घडण्याचे प्रकार घडतात. ते टाळण्यासाठी पत्रिका वाटप करण्यापेक्षा अलीकडे सोशल मीडियासारखे माध्यम वाढत असताना त्याचा वापर करून घेतला पाहिजे. पत्रिका न छापणे म्हणजे वृक्षतोड टाळण्यासारखे असून, हे पर्यावरणस्नेहीदेखील आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात समाज जागृतीची भूमिका बजावत सात दिवस मालिकेतून प्रबोधनदेखील केले होते. त्यातून प्रेरणा घेऊन अशोक व वसुंधरा देशमुख यांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस त्यानिमित्ताने पुन्हा एकदा विवाह सोहळा करण्याचे नियोजन करण्यात आले. रवींद्रनाथ विद्यालयातील शिक्षिका अनुराधा देशमुख-बर्वे व तसेच बीएसएनएलमधील उपमंडल अभियंता प्रसाद बर्वे यांच्या पुढाकाराने पत्रिका टाळून सर्व मित्रपरिवाराला व्हॉट्सअ‍ॅप व अन्य सोशल मीडियावरून निमंत्रणे पाठविण्यात आली आणि त्यानुसार कार्यक्रम झाला.  या सोहळ्यास उपस्थित नागरिकांना देशमुख बर्वे परिवाराच्या वतीने वृक्षलागवड, मुलींचे शिक्षण या विषयावर प्रबोधनाची घोषवाक्ये असलेल्या अडीचशे कापडी पिशव्या भेट देण्यात आल्या.

टॅग्स :Nashikनाशिक