शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नृत्यतपस्येचा सुवर्ण महोत्सव  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 09:06 IST

नाशिकमधील कीर्ती कला मंदिरचे २३ फेब्रुवारीपासून सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने एक विशेष कार्यक्रम गुरुदक्षिणा सभागृहात होत आहे. या प्रवासाचा यानिमित्ताने हा धावता आढावा.

वंदना अत्रे ज्येष्ठ पत्रकार, संगीत-कला समीक्षकखाद्या विशिष्ट शिक्षणाचा मुलीने हट्ट धरावा असे ते अजिबात दिवस नव्हते. आणि शिक्षणासाठी आपले गाव सोडून थेट मुंबई, पुण्याला जाणाऱ्या धीट (त्या काळात आगाऊ!) मुली नाशकात एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्यासुद्धा नसतील. पण, आसपासचे वास्तव जणू दिसतच नसावे अशा आत्मविश्वासाने ती थेट मुंबईला, तेव्हाचे सेलिब्रिटी दर्जाचे, गुरू गोपीकृष्णजी यांच्याकडे कथ्थक शिकायला गेली. सहा वर्षे मुंबईत ठाणे-खार असा प्रवास करीत नृत्यात प्रवीण झाली आणि मग, “खूप नाच करायला मिळावा” यासाठी नाशिकसारख्या कर्मठ शहरात नृत्य शिकवणारा क्लास सुरू केला. नाशिकमधील तो क्लास, कीर्ती कला मंदिर, यंदा आपला सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे. सत्तरीच्या दशकात क्लास सुरू करण्यासाठी ज्या उत्साहाने त्या क्लासची गुरू कामाला  भिडली होती, त्याच तरुण उत्साहाने आजही ती, रेखा नाडगौडा, सुवर्ण महोत्सवाच्या तयारीला लागली आहे. नाशिकमधील कित्येक कुटुंबांना नृत्याचा लळा लावणाऱ्या आणि नृत्य शिकणाऱ्या मुलींसोबत कीर्ती कला मंदिरच्या परिवारात सामावून घेणाऱ्या रेखाताई यांच्या किमान २५ मुली आज नृत्य गुरू म्हणून देश परदेशात काम करीत आहेत. “पायात चाळ बांधून काय करणार ही मुलगी?” असा अव्वल खवचट प्रश्न विचारणाऱ्या या शहराने आज त्यांचे कर्तृत्व मनोमन मान्य केले आहे.

  मुलींना नृत्य शिकवणे हे रेखाताईंचे प्राथमिक उद्दिष्ट नक्की होते; पण या निमित्ताने संस्कृतीच्या विविध पैलूंची मुलींना ओळख करून देण्याचाही त्यांचा हेतू होता. केवळ नृत्यातील बंदिशी, बोल, पढंत म्हणजे कथ्थक नाही हे बोलण्यापेक्षा त्यांनी कृतीतून मुलींना सांगितले. त्यासाठी तात्यासाहेबांच्या कवितांवर नृत्य बसवले, पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या गायनासाठी वापरल्या जाणाऱ्या बंदिशी नृत्यातून मांडल्या, महाराष्ट्राचे मराठीपण नृत्यातून दाखवले आणि भारतीय संस्कृतीचे वेगळेपण मिरवणारी नवविधा भक्तीसुद्धा रसिकांच्या पुढे मांडली. ७६ साली डॉ. वसंतराव गुप्ते यांच्या हस्ते कीर्ती कला मंदिराचे उद्घाटन झाले. अशा प्रकारच्या उपक्रमांचे त्यावेळी या गावाला अप्रूप होते. त्यामुळे नाशिक एज्युकेशन सोसायटीने त्यांच्या सारडा मंदिरचे सभागृह क्लास घेण्यासाठी सहज उपलब्ध करून दिले आणि क्लास सुरू झाला. रेखाताईंनी या निमित्ताने जो आप्तपरिवार जमा केला त्यापैकी तिघीजणी, राधिका राजपाठक आणि कुमुदताई-कमलताई  ही अभ्यंकर जोडगोळी, जणू त्यांच्या बरोबरीने या क्लासच्या अघोषित संचालिका झाल्या. 

राजपाठकबाई संहिता लिहायच्या आणि कुमुदताई-कमलताई नृत्यनाट्य बसवण्यासाठी लागणारी मदत करण्यासाठी त्यांच्या मागे उभ्या असायच्या. गोपीकृष्णजी यांच्या अकस्मात निधनानंतर आपल्या गुरूंच्या स्मृत्यर्थ रेखाताईंनी ९४ सालापासून पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सव सुरू केला, जो आजही सुरू आहे. त्या निमित्ताने पंडित बिरजू महाराजांपासून राजेंद्र गंगाणीपर्यंत अनेक नृत्य कलाकार, विविध शैलींचे गुरू आणि त्यांचे प्रयोग त्यांनी नाशिकच्या रसिकांच्या समोर आणले. नृत्याच्या माध्यमातून बदलत्या काळाशी जोडून घेण्याचे व या काळाचे प्रश्न मांडण्याचे रेखाताईंचे प्रयत्न दाद देण्याजोगे असतात. 

आज रेखाताईंच्या दोघी मुली, लंडन निवासी अश्विनी काळसेकर आणि अदिती पानसे त्यांच्या आईची परंपरा तितक्याच दमदारपणे पुढे नेत आहेत.  सुवर्ण महोत्सवानिमित  वर्षभर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम/उपक्रम रेखाताईंनी आखले आहेतच. नृत्य संगीताच्या सहवासात जगणाऱ्या माणसांचे वय वाढत नाही असे म्हणतात, रेखाताई हे त्या समजुतीचे साक्षात उदाहरण आहे! कीर्ती कला मंदिरची शताब्दी पण ती तेवढ्याच उत्साहाने साजरी करेल...!