शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

सोन्याची दुकाने उघडली

By admin | Updated: April 13, 2016 23:33 IST

खरेदी-विक्री सुरू : दुकानदार, ग्राहकांमध्ये उत्साह; कारागिरांना रोजगार

नाशिक : सराफ असोसिएशनने अबकारी करविरोधातील ४२ दिवसांचा बंद मागे घेतल्यानंतर काही सुवर्णकारांनी मंगळवारी दुकाने उघडली. सराफ असोसिएशनने गुरुवारी दुकाने उघडण्याचा निर्णय बदलून बुधवारी (दि. १३) सर्व सुवर्णकारांना दुकाने उघडण्याचे आवाहन केल्याने गुरुपुष्यामृत योगच्या पार्श्वभूमीवर सराफांनी मंगळवारी व बुधवारी दुकानांची मांडणी व साफसफाई केली. सराफांची दुकाने उघडल्याने ग्राहकांमध्ये उत्साह दिसला. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी सोन्याची खरेदी केली, तर गुरुपुष्यामृत योग साधण्यासाठी सोन्याची खरेदी उद्यावर ढकलल्याने गुरुवारी शहरातील सराफांची दुकाने ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेलेले पहायला मिळतील. दरम्यान, सराफ बाजार सुरू झाल्याने येथे रोजंदारीवर काम करणाऱ्या कारागिरांनाही रोजगार मिळाला आहे. सराफांनी बंद मागे घेण्याचा निर्णय घेतल्याने सोन्याला पुन्हा एकदा झळाळी प्राप्त झाली असून लग्नसराईच्या अखेरच्या टप्प्यात का होईना सुवर्णकारांची दुकाने उघडल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. अबकारी कराच्या विरोधात देशभरातील छोटेमोठे सुवर्णकारांनी २ मार्चपासून शटर डाउन केलं होतं; मात्र सराफांनी नरमाईची भूमिका घेऊन बंद मागे घेत १४ एप्रिलपासून दुकाने उघडणार असल्याचे सराफ संघटनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले. काही व्यावसायिकांनी बंद मागे घेण्याची घोषणा होताच मंगळवारी दुकाने उघडल्याने उर्वरित व्यावसायिकांनाही बुधवारपासून दुकाने उघडण्याचे आवाहन महाराष्ट्र सराफ असोसिएशनतर्फे करण्यात आले. त्यामुळे सराफबाजारासह शहरातील सर्व दुकाने उघडल्याने ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. ४२ दिवसांच्या संपानंतर दुकाने उघडल्याने अजून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसला तरी गुरूपुष्यामृत योगाच्या निमित्ताने गुरुवारी चांगली खरेदी होईल,अशी आशा सराफांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)