शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याला विक्रमी भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:37 IST

भारतीय संस्कृतीत सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीयांचे आणि विशेषत: महिलांचे सोन्याप्रति खास प्रेम आहे. लग्नसमारंभ आणि खासकरून सणांच्या दिवसांमध्ये हे सातत्याने अधोरेखित होत आलेले आहे. किंबहुना सोने आणि सेन्सेक्स बाजार यांच्यातही सारखी जुगलबंदी सुरू असताना सोन्यावर केंद्र सरकारने आणलेल्या निर्बंधानंतर सराफ बाजारात काहीसे नैराश्य पसरले होते; परंतु दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याला पुन्हा झळाळी प्राप्त झाली असून, शुक्रवारी सोन्यानी ३२ हजार ६०० रुपयांची उच्चांकी पातळी गाठली असून, चांदीचे भावही प्रतिकिलो ४० हजारांच्या पार पोहोचले आहेत.

ठळक मुद्देसराफ बाजाराला झळाळी : चांदी चाळीस हजारांच्या पार

नाशिक : भारतीय संस्कृतीत सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीयांचे आणि विशेषत: महिलांचे सोन्याप्रति खास प्रेम आहे.लग्नसमारंभ आणि खासकरून सणांच्या दिवसांमध्ये हे सातत्याने अधोरेखित होत आलेले आहे. किंबहुना सोने आणि सेन्सेक्स बाजार यांच्यातही सारखी जुगलबंदी सुरू असताना सोन्यावर केंद्र सरकारने आणलेल्या निर्बंधानंतर सराफ बाजारात काहीसे नैराश्य पसरले होते; परंतु दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याला पुन्हा झळाळी प्राप्त झाली असून, शुक्रवारी सोन्यानी ३२ हजार ६०० रुपयांची उच्चांकी पातळी गाठली असून, चांदीचे भावही प्रतिकिलो ४० हजारांच्या पार पोहोचले आहेत.सोन्यावर निर्बंध लादल्यानंतर सराफ बाजारात पसरलेले नैराश्य दूर करण्यासाठी दोन लाखांपर्यंतच्या सोने खरेदीसाठी पॅनकार्ड लागणार नसल्याचे जाहीर झाल्यानंतर गेल्यावर्षी सावरलेल्या सराफ बाजारात यावर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उत्साह संचारला आहे.हे उत्साहाचे वातावरण दिवाळीच्या दिवसांमध्ये सराफ बाजारात स्पष्टपणे दिसून येत असून, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत बाजारपेठेत यंदाच्या दिवाळीत अधिक उत्साह दिसून येत आहे.सोने खरेदी अपेक्षेप्रमाणे वाढल्याने शुद्ध सोन्याचे (२४ कॅरेट) ३२ हजार ६०० रुपये तर २२ कॅरेट सोन्याचे भाव ३० हजार ८०० रुपयांपर्यंत पोहोचले असून, चांदीचे दरही प्रतिकिलो ४० हजार १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.हे भाव यापुढेही वाढून येत्या काळात सोने ३३ ते ३४ हजारांचा पल्ला गाठण्याची शक्यता सराफ व्यावसायिक राजेंद्र ओढेकर यांनी व्यक्त केली आहे.श्रीमंताची पसंती असलेल्या प्लॅटिनमकडेही ग्राहकांचे पाय हळूहळू वळत आहेत. हिऱ्यांच्या दागिन्यांनाही ग्राहकांची पसंती मिळत आहे; परंतु सर्वाधिक ग्राहक हा सोन्याच्या दागिन्यांना असून, सोन्याच्या उलाढालीवरच बाजारपेठ अवलंबून आहे. यंदाच्या दिवाळीने बाजारपेठेत उत्साह संचारला असून, हा उत्साह दिवाळीपर्यंत असाच टिकून राहणार असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.

टॅग्स :businessव्यवसायMarketबाजारGoldसोनं