शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

जागरूक युवकांमुळे आले सोनसाखळी चोर ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 01:29 IST

दोन दुचाकींवरून एकापाठोपाठ आलेल्या चौघांपैकी दोघांनी चेहेडी पंपिंग स्टेशन येथे एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केला तर दुसऱ्या दुचाकीवरील चोरट्यांना जागरूक युवकांनी पाठलाग करून दारणा नदीच्या शिवारात रोखून धरत नाशिक रोड पोलिसांच्या हवाली केले. हे दोघेही चोरटे संगमनेरचे असून त्यांचे दोन साथीदार दुचाकीने पळून गेले असून नाशिक रोड पोलिसांनी संगमनेर पोलिसांना माहिती देत त्यांचा शोध घेण्यास सांगितले.

ठळक मुद्देसंगमनेरची टोळी सक्रिय : चोरट्यांची जोडी मंगळसूत्र घेऊन फरार

नाशिक रोड : दोन दुचाकींवरून एकापाठोपाठ आलेल्या चौघांपैकी दोघांनी चेहेडी पंपिंग स्टेशन येथे एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केला तर दुसऱ्या दुचाकीवरील चोरट्यांना जागरूक युवकांनी पाठलाग करून दारणा नदीच्या शिवारात रोखून धरत नाशिक रोड पोलिसांच्या हवाली केले. हे दोघेही चोरटे संगमनेरचे असून त्यांचे दोन साथीदार दुचाकीने पळून गेले असून नाशिक रोड पोलिसांनी संगमनेर पोलिसांना माहिती देत त्यांचा शोध घेण्यास सांगितले.याबाबत अधिक माहिती अशी, चेहेडी पंपिंग येथील भगवा चौक साईआदेश अपार्टमेंटमधील रहिवासी अलका दिलीप ताजनपुरे या रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांची दळण दळण्याची गिरणी बंद करून घरी परतत होत्या. या वेळी दोन दुचाकींनी एकामागोमाग आलेल्या चोरट्यांच्या दोन जोड्यांपैकी एका जोडीने ताजनपुरे यांच्या गळ्यातील ४५ हजारांची सोन्याची साखळी हिसकावून पोबारा केला. तत्पूर्वी सोनसाखळी हिसकावण्याच्या प्रयत्नात अयशस्वी झालेल्या चोरट्यांनी घोडे वस्तीच्या दिशेने पलायन केल्याने ताजनपुरे यांनी जोरजोरात ‘चोर-चोर’ अशी आरोळी दिल्याने आजूबाजूच्या जागरूक युवकांनी तत्काळ दुचाकीने घोडे वस्तीच्या दिशेने चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. या वेळी समोर नदीचे पात्र आल्याने आणि चोरट्यांना वाट न सापडल्याने चोरटे पुन्हा माघारी येण्याच्या प्रयत्नात असताना चोरट्यांना युवकांनी घेरून रोखले. या वेळी पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्याने काही वेळेतच पोलीसदेखील घोडे वस्तीमध्ये दाखल झाले. या दोघा चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी कपिल कृष्णा जेथे (१९, रा. जेथे काॅलनी, संगमनेर), गणेश रामदास बन (२०, रा. इंदिरानगर, संगमनेर) अशी स्वत:ची ओळख सांगितली. त्यांच्या ताब्यातील दुचाकी (एमएच१५  डीझेड५८६५) पोलिसांनी जप्त केली आहे. ताजनपुरे यांच्या गळ्यातील ४५ हजारांची सोन्याची पट्टी चेन व पॅन्डल चोरून नाशिक-पुणे महामार्गाने दुचाकीवरून या चोरट्यांचे साथीदार राज सय्यद, रॉकी उर्फ विकी उर्फ ट्रिपल एक्स (दोघे रा. संगमनेर) हे फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. संशयित कपिल व गणेश यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चोरट्यांकडील दुचाकीही केली जप्तया दोघा चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी कपिल कृष्णा जेथे (१९, रा. जेथे काॅलनी, संगमनेर), गणेश रामदास बन (२०, रा. इंदिरानगर, संगमनेर) अशी स्वत:ची ओळख सांगितली. त्यांच्या ताब्यातील दुचाकी (एमएच१५  डीझेड५८६५) पोलिसांनी जप्त केली आहे.  

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयChain Snatchingसोनसाखळी चोरीArrestअटक