शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्ण व्यवसायाला मिळतेय झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:31 IST

मालेगाव शहराची सुवर्ण व्यावसायिकांची बाजारपेठ फुलू लागली असून नाशिक, जळगावच्या सुवर्ण व्यावसायिकांनी येथील बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामीण भागासह कसमादे परिसरातून दागदागिने खरेदीसाठी महिलावर्गाची वर्दळ वाढू लागली आहे.

बाजारात चैतन्यसंगमेश्वर : मालेगाव शहराची सुवर्ण व्यावसायिकांची बाजारपेठ फुलू लागली असून नाशिक, जळगावच्या सुवर्ण व्यावसायिकांनी येथील बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामीण भागासह कसमादे परिसरातून दागदागिने खरेदीसाठी महिलावर्गाची वर्दळ वाढू लागली आहे. दसरा-दिवाळीसाठी शहरातील सुवर्णबाजारात विविध प्रकारचे दागिने महिलावर्गाचे लक्ष आकर्षून घेत आहे. जुन्या गावात म्हणजे शहराच्या पूर्वेकडे बाजारपेठ स्थिरावली होती. तांबाकाटा, गूळबाजार, शिंपाटी, मामलेदार गल्ली, टिळकरोड, सरदार चौक, सांडवा पूल, सराफ बाजार आदी भागातच असणारा सुवर्ण व्यवसाय आता मोसमपूल ते सटाणानाका, कॅम्पपर्यंत बाजारपेठ व्यापून घेत आहे. शहराचा भौगोलिक विस्तार झाला. लोकसंख्या वाढली. संगमेश्वर, सावतानगर, कलेक्टरपट्टा, सटाणानाका, नववसाहत, कॅम्परोड आदी भागात हा विस्तार झाला. त्याबरोबर नवीन पिढीने कात टाकत या नवीन भागात नवीन इमारती उभारल्या. नवी विविध प्रकारची दुकाने, मॉल्स थाटली. याबरोबरच विविध उत्पादक कंपन्यांनी मालेगाव ही मोठी बाजारपेठ हेरून येथे नवनवीन शोरूम उभी केली.  शिवाजी पुतळा, मोसमपूल, सटाणारस्ता, कॅम्प रस्ता, संगमेश्वरातील सावतानगर, मोतीबागनाका रस्ता, आग्रारोड आदी भागात शोरूम सुरू झाली. सोने दागिन्यांचे मोठे शोरूम सर्वांनाच आकर्षित करू लागले आहेत. शहराच्या पूर्व भागात सराफ बाजाराचा आता विस्तार झाला आहे. पश्चिम भागातही सराफाची दुकाने सुरू झाली आहेत. शहरातील सराफाबरोबरच नाशिक, जळगाव, पुणे आदी ठिकाणांच्या सुवर्णालंकाराच्या शाखा मालेगावात सुरू झाल्या आहेत. आकर्षक योजनांद्वारे ग्राहकांना आकर्षित करतात. यात व्यावसायिकांनी विविध कल्पनेद्वारे व्यवसाय वाढविला आहे. आगामी काळात नवनवीन उद्योगधंदे, कारखाने सुरू झाल्यास मालेगावची बाजारपेठ अधिकच बहरेल. मालेगाव जिल्हा निर्मितीकडे शहरवासीय डोळे लावून बसले आहेत. येथील व्यापारी उदीम वाढेल अशी आशा व्यावसायिक बाळगून आहेत.मुंबई, पुणे, नाशिक आदी शहरात जशा अत्याधुनिक सुविधा मिळतात तशा सुविधा आता मालेगावकरांना आम्ही देत आहोत. विविध फॅशनचे कपडे तेही तज्ज्ञांकडून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मालेगावच्या ग्राहकांना इतरत्र खरेदीसाठी जाण्याची गरज नाही.  - शर्मिला अरविंद पवार,  व्यावसायिक, मालेगावसंपूर्ण देशात नोटाबंदी व जीएसटी करप्रणाली लागू झाल्यानंतर थंडावलेली बाजारपेठ आता बहरू लागली आहे. आगामी दसरा-दिवाळी सणात बाजारपेठ अधिकच गर्दी होऊन आर्थिक उलाढाल वाढेल अशी आशा आहे.- सुदर्शन छल्लाणी,  गृहउद्योजक, मालेगावआगामी जिल्हास्तरावरील गाव म्हणून मालेगावची ओळख आहे. ग्राहकांना सेवा देण्यासाठी आम्ही विस्तारित भागात नवीन शोरूम सुरू केले आहेत. त्यामुळे ग्राहकांची सोय करू शकलो व व्यवसायातही वाढ झाली आहे.- राजेश गोविंद दुसाने,  सराफ मालेगाव