शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
4
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
5
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
6
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
7
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
8
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
9
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
12
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
13
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
14
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
15
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
16
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
17
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
18
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
19
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
20
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य

घोळात घोळ : रेडिमेड गणवेशाबाबत महामंडळापुढे पेच; गणवेशाऐवजी कापड देण्याची मागणी एसटी कर्मचाºयांच्या गणवेशाला विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 01:18 IST

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाने कर्मचाºयांसाठी नवे गणवेश आणले आणि मोठा गाजावाजा करून कर्मचाºयांना प्रातिनिधिक स्वरूपात वाटपही करण्यात आले.

ठळक मुद्देगणवेश मिळण्यास विलंब शिलाईच्या दर्जाबाबत शंका

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाने कर्मचाºयांसाठी नवे गणवेश आणले आणि मोठा गाजावाजा करून कर्मचाºयांना प्रातिनिधिक स्वरूपात वाटपही करण्यात आले, मात्र या गणवेशाच्या शिलाईच्या मुद्द्यावरून कर्मचाºयांमध्ये नाराजी असल्याने कर्मचाºयांना गणवेश मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. रेडिमेड गणवेशाऐवजी कर्मचाºयांना कापड देण्याची मागणी केल्याने महामंडळापुढे पेच निर्माण झाला आहे. एसटीच्या चालक-वाहकांसह शहरातील मुख्य कार्यालय वर्कशॉपमधील कर्मचारी व अधिकाºयांसाठी नवीन गणवेश महामंडळाने तयार केले आहेत. राज्यात अनेक ठिकाणच्या डेपोंमध्ये कर्मचाºयांना या गणवेशाचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप केले जात आहे. नाशिकमध्येही वेगवेगळ्या ९ विभाग व श्रेणीतील १८ कर्मचारी तथा अधिकाºयांना नवीन गणवेशाचे मुख्य कार्यालयाच्या आवारात वाटप करण्यात आले आहे. मात्र गणवेश हाती पडल्यानंतर कर्मचाºयांनी गणवेशाचे कापड तसेच शिलाईच्या दर्जाबाबत शंका उपस्थित करून गणवेश आरामदायी नसल्याचा आरोप चालविला आहे. गणवेश कुणाच्याही मापात नसल्याने ते परिधान केल्यानंतर आरामदायी वाटत नसल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. एसटी महामंडळाच्या नाशिक विभागात सुमारे ५ हजार कर्मचारी असून, त्यांना दरवर्षी एसटी महामंडळाकडून गणवेशासाठी कापड दिले जात होते. परंतु ते कापड पसंत न पडल्यामुळे कर्मचारी त्यांच्या सोयीने गणवेशाचे कापड खरेदी करून स्वत: खर्च करून गणवेश शिवून घेत होते. पूर्वीप्रमाणेच कर्मचाºयांना गणवेशाचे कापड पुरविण्यात यावे, अशी कर्मचाºयांची मागणी आहे. सध्या शिवून देण्यात येणारे गणवेश कुणालाही योग्य मापात बसत नसल्याने महामंडळाने कर्मचाºयांवर गणवेश लादू नये, असे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. त्यामुळे महामंडळाने गणवेश पुरविले तरी ते कर्मचारी परिधान करतीलच याची कोणतीही शाश्वती नसल्याने महामंडळापुढेही पेच निर्माण झाला आहे. अर्थात साधारणपणे मार्च-एप्रिलमध्ये कर्मचाºयांना उर्वरित गणवेश दिले जाणार आहेत. आता प्रातिनिधिक स्वरूपात दिलेले गणवेशही कर्मचारी वापरत नसल्याने नवे गणवेश कर्मचारी परिधान करतील की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. अर्थात लेखी अथवा संघटनात्मक पातळीवर गणवेशाला अद्याप विरोध करण्यात आला नसला तरी येत्या काही दिवसांत गणवेशावरूनही आंदोलन होण्याची शक्यता आहे. गणवेशाची सक्ती न करता त्यातून मार्ग काढण्याचा सूर कर्मचाºयांमध्ये सध्या उमटत आहे.महामंडळाची अडचण महामंडळाने कर्मचाºयांनागणवेशाचे कापड देण्याऐवजी गणवेश शिलाई करून देण्यासाठी निविदा दिलेली असल्याने महामंडळाला कर्मचाºयांना कपडा देण्यास अडचण निर्माण होणार आहे. महामंडळाने एकसारखे गणवेश अशी संकल्पना म्हणून गणवेश बनविले असले तरी महामंडळाने दिलेले गणवेश कर्मचारी परिधान करतील का? असा प्रश्न आहे. याबरोबरच तशी सक्ती केल्यास त्याविरोधातही कर्मचारी जाण्याची शक्यता आहे.