परिसरात राहणाऱ्या तारामती पंडित गवळी (५९) मंगळवारी सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी पतीसमवेत पायी चालत जात असताना गजानन दर्शन अपार्टमेंट समोर रस्त्यावर हेल्मेटधारक दोघांनी दुचाकी हळुवारपणे करून गवळी यांच्या गळ्यात असलेली ३५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी ओरबाडून पलायन केले.
सोनसाखळी चोरट्यांनी आता सकाळी पायी फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना लक्ष करत सोनसाखळी चोरण्याचे सत्र सुरू केल्याने संताप व्यक्त होत आहे.
---इन्फो --
हेल्मेटचा असाही गैरफायदा
वाढते अपघात टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून दुचाकी चालविताना वाहनधारकांना हेल्मेटसक्ती केली जात आहे.
पोलिस प्रशासनाची संकल्पना योग्य असली तरी आता हेल्मेट सक्तीचा फायदा सोनसाखळी चोर घेत असून हेल्मेट परिधान करून चोरटे सहज सोनसाखळी ओरबाडून पलायन करत असल्याने पोलिसांना सोनसाखळी चोर गजाआड करणे आव्हान ठरत आहे.