शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक खर्चात गोडसे, महाले आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 01:52 IST

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांचा निवडणूक खर्चाचा अंतिम अहवाल जाहीर करण्यात आला असून, नाशिकमधून हेमंत गोडसे, तर दिंडोरीतून धनराज महाले हे निवडणूक खर्चात आघाडीवर राहिले.

नाशिक : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांचा निवडणूक खर्चाचा अंतिम अहवाल जाहीर करण्यात आला असून, नाशिकमधून हेमंत गोडसे, तर दिंडोरीतून धनराज महाले हे निवडणूक खर्चात आघाडीवर राहिले. विशेष म्हणजे दिंडोरीमधून विजयी झालेल्या उमेदवाराचा खर्च प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षाही कमी आहे, तर नाशिकमधून अपक्ष उमेदवाराने विजयी उमेदवाराच्या जवळपास निवडणूक खर्च केल्याचे खर्चाच्या आकडेवारीवरून दिसून येते.निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांना ७० लाखांची मर्यादा आहे. त्यानुसार उमेदवारांनी सादर केलेल्या निवडणूक खर्चाचे आॅडिट होऊन अंतिम खर्चाची यादी जाहीर करण्यात आली असून, त्यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी ६७ लाख ९० हजार ७०१ इतका खर्च केला, तर त्या खालोखाल अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांचा खर्च ५९ लाख ८९ हजार ५७१ इतका राहिला. राष्टÑवादीचे समीर भुजबळ यांनी ५६ लाख ४० हजार ५०० रुपये इतका खर्च केला. वंचित आघाडीचे उमेदवार पवन पवार यांनी १६ लाख ५४ हजार ४८४ इतका खर्च दाखविला आहे. अन्य उमेदवारांनीदेखील एक ते दीड लाखांपर्यंत खर्च केल्याची नोंद करण्यात आली आहे. या मतदारसंघातील सर्व १८ उमेदवारांचा एकूण निवडणूक खर्च हा २ कोटी ८ लाख ३४ हजार ११३ इतका झाला आहे.निवडणुकीच्या निकालानंतर महिन्याभराच्या आत निवडणुकीत केलेला खर्च सादर करावा लागतो त्यानुसार अंतिम तारखेपर्यंत उमेदवारांनी खर्चाचा तपशील सादर केला आहे. नाशिक मतदारसंघातून सर्वाधिक १८ उमेदवारांनी निवडणूक लढविली.दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून आठ उमेदवार रिंगणात होते. या मतदारसंघातून भाजपाच्या डॉ. भारती पवार या विजयी झाल्या आहेत. त्यांनी ४७ लाख ४९ हजार ४७८ इतका खर्च केला, तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्टÑवादीचे धनराज महाले यांनी ५३ लाख ८३ हजार ८५२ इतका खर्च केला. खर्चाच्या बाबतीत ते मात्र पहिल्या क्रमांकावर राहिले. माकपाचे जिवा पांडू गावित यांनीदेखील ३१ लाख ३१ हजार ६६२ इतका खर्च केला आहे. बापू बर्डे आणि तुकाराम बागुल या उमेदवारांनीदेखील लाखोंच्या घरात खर्च केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnashik-pcनाशिकdindori-pcदिंडोरी