शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

गोदाकाठी पाच तास वीजपुरवठा मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 15:18 IST

सायखेडा : नांदूरमधमेश्वर धरणात सुरळीत पाणी पोहचून धरण पाण्याने भरत नाही तोपर्यंत गोदाकाठ भागातील २२ तास बंद असलेला वीज पुरवठामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. जनावरांना चारा, पाणी देता येत नाही. पिण्याचे पाणी भरता येत नाही त्यामुळे किमान पाच तास सुरु करावा यासाठी शेतक-यांनी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन किमान पाच तास वीजपुरवठा सुरु करण्याची मागणी खेडकर यांनी मान्य केली असून पाच तास वीजपुरवठा सुरु करणार असल्याचे सांगितले.

सायखेडा : नांदूरमधमेश्वर धरणात सुरळीत पाणी पोहचून धरण पाण्याने भरत नाही तोपर्यंत गोदाकाठ भागातील २२ तास बंद असलेला वीज पुरवठामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. जनावरांना चारा, पाणी देता येत नाही. पिण्याचे पाणी भरता येत नाही त्यामुळे किमान पाच तास सुरु करावा यासाठी शेतक-यांनी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन किमान पाच तास वीजपुरवठा सुरु करण्याची मागणी खेडकर यांनी मान्य केली असून पाच तास वीजपुरवठा सुरु करणार असल्याचे सांगितले.उपजिल्हाधिका-यांना भेटलेल्या शिष्टमंडळात खासदार हेमंत गोडसे, आमदार अनिल कदम , आमदार योगेश घोलप यांच्यासह शेतक-यांचा समावेश होता. दारणा, वालदेवी, मुकणे, गंगापुर धरणातून दोन हजार क्युसेस पाणी नादुरमध्यमेश्वर धरणात सोडल्याने पाणी सुरळीत जावे , डाव्या आणि उजव्या कालव्याला पाणी पुरवठा करण्यात येत नाही तो पर्यंत नदीकाठच्या विहिरीचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. २४ तासात अवघा दोन तास वीजपुरवठा चालू ठेवला जात आहे. दोन तासात जनावरांच्या चाºयाला पाणी देऊ शकत नाही , पिण्याच्या पाण्याचा टाक्या भरणे होत नाही. त्यामुळे किमान पाच ते सहा तास वीजपुरवठा द्यावा अशी मागणी शेतकºयांनी केली होती. शेताच्या बांधाजवळून गोदावरी खळखळ वाहते, मुबलक पाणी आहे, मात्र वीज पुरवठा खंडित असल्याने शेतात उभे असलेल्या पिकांना शेतकरी पाणी देऊ शकत नव्हते, जनावरांच्या चाºयाला पाणी नसल्याने हिरवा चारा सुकू लागले होते. दोन तासात घरातील वीज पंपापासून पाईपलाईन द्वारे टाक्या, घरापर्यंत पाणी जायला वेळ लागत होता पाणी पोहचत नाही, तोच वीज पुरवठा खंडित होत असे. अशा परिस्थितीत किमान ५ ते ६ तास वीज पुरवठा सुरु ठेवावा अशी मागणी शेतकºयांनी केली होती. खेडकर यांनी पाच तास वीज पुरवठा सुरु ठेवण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :Nashikनाशिक